लंडन, 13 जून : इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या महासंग्रामाला 30 मे पासून सुरुवात झाली. पहिल्या आठवड्यातील सामने नीट झाले पण 7 जूनपासून पावसाने अनेक सामन्यांवर पाणी फिरवलं आहे. आतापर्यंत तीन सामने रद्द झाले तर दोन सामने कमी षटकांचे खेळवण्यात आले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही अजून सुरू झालेला नाही. इंग्लंडमध्ये पावसाचे वातावरण माहिती असतानाही आयसीसीने असे नियोजन केलेच कसे असा प्रश्न आता चाहत्यामधून विचारला जात आहे. खेळाचा खेळखंडोबा केल्याचंही चाहत्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर आयसीसीच्या या निर्णयावर सडकून टीका केली जात आहे. क्रिकेट चाहत्यांची पावसाने निराशा केली आहे. त्यामुळे चाहत्यांनी आयसीसीवर राग काढला आहे. आय़सीसी मूर्ख असून मैदान झाकता येत नाही का? पुढच्या सर्व स्पर्धांसाठी आय़सीसीने काळजी घ्यायला हवी. वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वाईट आयोजन आयसीसीने केलं असल्याचंही चाहत्यांनी म्हटलं आहे. आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी चुकीचा देश निवडल्याचं सोशल मीडियावर म्हटलं आहे. पण खरेतर वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी देश तितके सक्षम हवेत. सध्या तरी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हेच देश वर्ल्ड कपचे आयोजन करू शकतात. 2011 चा वर्ल्ड कप भारतात तर 2015 चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात झाला होता. त्यामुळे यंदा इंग्लंडला यजमानपद देण्यात आलं होतं.
पावसामुळे सामने रद्द झाले आणि चाहतेही निराश झाले. यावर चाहत्यांनीच आता आयसीसीला नवनवीन उपाय सुचवले आहेत.अर्थात ते अंमलात आणण्यासारखे नसले तरी आयसीसीला चपराक देणारेच आहे. एका चाहत्याने म्हटलं आहे की, मैदान दोन समान भागात विभागून द्या. दोन्ही संघापैकी जो संघ पहिल्यांदा मैदान सुकवेल तो विजेता. सध्याच्या परिस्थितीत हाच पर्याय आयसीसीला वर्ल्ड कपसाठी योग्य विजेता मिळवून देऊ शकतो असं चाहत्याने म्हटलं आहे.
इंग्लंडमध्ये सुरुवातीचा एक आठवडा स्पर्धा सुरळीत झाली. पण नंतर पावसाने सामने वाया गेले. तिसऱ्यांदा पावसाने सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी आयसीसीवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. पावसाच्या वातावरणाने नाणेफेक जरी उशिरा झाली तरी त्यावर नेटिझन्सनी तोंडसुख घेतलं. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा पोहण्याचा निर्णय कोण घेणार? असा खोचक सवाल आयसीसीला विचारण्यात आला. इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरु झाली असली तरी आय़सीसीने ती पोहण्याची स्पर्धा केली पाहिजे असंही चाहत्यांनी सुचवलं आहे.
आयसीसीने इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचे आयोजन का केले असा सवाल होत असताना एका चाहत्याने याचं उत्तर दिलं आहे. आयसीसीला पाऊस खूप आवडतो म्हणून इंग्लंड आणि वेल्स मध्ये वर्ल्ड़ कप स्पर्धा भरवली आहे.
पावसावरून आयसीसीची खिल्लीही उडवली जात आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार गोलंदाजी किंवा फलंदाजीचा निर्णय घेतो. तर पावसामुळे उशिरा नाणेफेक झालेल्या सामन्यात वातावरणाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा पाऊस पडण्याचा निर्णय घेतला अशी टीकाही चाहत्यांनी केली आहे.
आयसीसीने त्यांच्या क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चा लोगो बदलावा असंही चाहत्यांनी सुचवलं आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीच्या वर आता छत्री लावावी असं चाहत्यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामन्यात पाऊस असला तरी 16 जूनच्या सामन्यात यायला नको असं म्हटलं आहे. वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी ‘हा’ खेळाडू मिळवून देणार विजय? वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची ‘गब्बर’ जागा?