JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला, बायोपिकमध्ये त्याची भूमिका करायची असेल तर...

सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला, बायोपिकमध्ये त्याची भूमिका करायची असेल तर...

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगूली (Saurab Ganguly) याच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर : गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात बायोपिक बनवण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंवर आधारित बायोपिक विशेष प्रसिद्धी मिळवत आहेत. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या बायोपिकला  (MS Dhoni – The Untold Story) मोठी लोकप्रियता मिळाल्यानंतर माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या जीवनावर देखील लवकरच चित्रपट येणार आहे. यामध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिका साकारणार आहे. दरम्यान आता  भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगूली (Saurab Ganguly) याच्या जीवनावर आधारित सिनेमाची देखील चर्चा सुरू झाली आहे. नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमात यावर भाष्य करताना सौरव गांगुलीने आपली भूमिका कुणी करू शकत नसल्याचे म्हटले. यावर नेहाने या भूमिकेबाबत हृतिकचे नाव घेतले. (हे वाचा- IPL 2020 आधीच UAE मध्ये डिव्हिलियर्स हैराण, म्हणाला-चेन्नईची आठवण येतेय) दरम्यान याविषयी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, ‘ माझी भूमिका कुणी करू शकेल असे मला वाटत नाही,  मुख्य मुद्दा म्हणजे त्यासाठी त्याला माझ्यासारखी साधी शरीरयष्टी करावी लागेल. अनेकांना ह्रतिकसारखी शरिरयष्टी हवी असते, मात्र माझी भूमिका करण्यासाठी त्याला माझ्यासारखी शरिरयष्टी करावी लागेल.’

दरम्यान गांगुलीने त्याच्या बायोपिकविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे.  मात्र आगामी काळात नक्की त्याचा बायोपिक येणार आहे की नाही, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. सध्या हृतिक रोशन त्याच्या क्रिश सीरिजमधील आगामी चित्रपटात दिसणार असल्याची शक्यता आहे. (हे वाचा- IPL 2020: हे 4 रेकॉर्ड रचण्यासाठी ‘हिट’मॅन सज्ज, पूर्ण करणार षटकारांचे द्विशतक ) गांगुलीच्या या प्रतिक्रियेनंतर खरंच हृतिक या भूमिकेत दिसणार का याबाबत चाहते उत्सूक आहेत. देखील हृतिकने त्याच्या अनेक भूमिकांसाठी त्याच्या शरीरयष्टीमध्ये बदल केले होते.  सुपर 30 या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी त्याने अतिशय साधारण अशी शरिरयष्टी असणाऱ्या मॅथ जिनीयसची भूमिका त्याने साकारली होती.  त्यामुळे गांगुलीची भूमिका साकारायची झालीच तर तो नक्की त्यावर मेहनत घईल याबाबत शंका नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या