JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कर्णधार रोहित शर्माबाबत हरभजन सिंगने केला मोठा खुलासा

कर्णधार रोहित शर्माबाबत हरभजन सिंगने केला मोठा खुलासा

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करीत आहे. हरभजन सिंगनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर रोहितसोबतची पहिली भेट आठवताना हा खुलासा केलाय.

जाहिरात

कर्णधार रोहित शर्माबाबत हरभजन सिंगने केला मोठा खुलासा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी : नागपूर टेस्ट मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या खेळीवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंगनं मोठं विधान केलंय. रोहितच्या नेतृत्वशैलीनं प्रभावित होऊन हरभजनसिंग म्हणाला की,‘जेव्हा मी त्याला सर्वांत प्रथम पाहिलं होतं, तेव्हाच मला कल्पना आली होती की तो खूप दीर्घ काळ आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल बॅट्समनपैकी एक असेल. एक बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून तो आता भारतीय क्रिकेट टीमसाठी किती महत्त्वाचा आहे, हे आपल्या सर्वांनाच समजलं आहे. तो एक चांगला बॅट्समन आहेच, पण त्यापेक्षा दसपट चांगला माणूस आहे’. हरभजन सिंगनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर रोहितसोबतची पहिली भेट आठवताना हा खुलासा केलाय. नागपूर येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मानं टीम इंडियाच्या क्रिकेट टीमचं नेतृत्व करून शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये रोहितनं कॅप्टन म्हणून पहिलं टेस्ट शतक झळकावलं. रोहितच्या या शतकाच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलियावर एक डाव 132 रनांनी संस्मरणीय विजय मिळवला. या मॅचनंतर रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य हरभजन सिंगनं केलंय. Shardul Thakur Wedding : शार्दुलच्या लग्नात क्रिकेट स्टार्सची हजेरी; संगीत कार्यक्रमात बेफाम होऊन नाचले रोहितसोबतची पहिली भेट आठवताना माजी क्रिकेटपटू हरभजन म्हणाला, ‘मी रोहित शर्माला बऱ्याच काळापासून ओळखतो. तो टीममध्ये दक्षिण आफ्रिकेतील टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा सामील झाला होता. तो टीम बसमध्ये माझ्या सीटच्या मागच्या सीटवर बसायचा’. ‘कैसा है रे तू?’ सारखी वाक्य मुंबईच्या शैलीत बोलताना मला तो अजूनही आठवतो. तो खूप चांगला माणूस आहे’. आयपीएलमधील यशस्वी कॅप्टन : रोहितच्या नेतृत्वशैलीनं प्रभावित होऊन हरभजननं त्याच्याबद्दल आणखी एक महत्त्वाचं विधान केलंय. इंडियन प्रीमियर लीग च्या इतिहासातील रोहित हा सर्वांत यशस्वी कॅप्टन असल्याचं त्यानं सांगितलं. तो म्हणाला, ‘आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा हा सर्वांत यशस्वी कॅप्टन ठरलाय. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्यापेक्षा मोठा कॅप्टन कोणी नाही. त्याने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. त्याची टीम चांगली आहे. पण तो ज्या पद्धतीनं संघाचं नेतृत्व करतो, ते अविश्वसनीय आहे’.

दरम्यान, जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट बॅट्समनपैकी एक असणाऱ्या रोहितची 2022 मध्ये टेस्ट मॅच फॉरमॅटसाठी विराट कोहलीच्या जागी भारताचा कॅप्टन म्हणून म्हणून निवड झाली. नागपूर येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये शतक झळकावल्यानंतर रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा पहिला भारतीय कॅप्टन ठरला. सध्या त्याच्या खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता ऑस्ट्रेलियासोबतच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहितच्या बॅटिंगकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या