सिडनी, 20 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज बाद झाला तर त्यासाठी गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचे कौतुल केले जाते. मात्र कधी फलंदाजानं स्वत:लाच बाद केले आहे असा प्रकार फार क्वचित घडतो. पण असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रिकेटपटूला त्याचा आत्मविश्वास कसा नडला हे या व्हिडीओमधून दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरू असलेल्या मार्श कपमध्ये लाजीरवाणा प्रकार घडला. जेव्हा स्वत:च्या अतिआत्मविश्वासामुळं क्रिकेटपटूनं पायावर कुऱ्याड मारून घेतली. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज गुरिंदर संधू मजेशीर प्रकारे बाद झाला. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या मार्श कपमध्ये गुरिंदर संधू ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, त्यावरून तो असा बाद होईल असे वाटत नव्हते. संधूनं तस्मानिया आणि क्विन्सलॅंड यांच्यात झालेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. मात्र ज्याप्रकारे तो बाद झाला, तो प्रकार लाजीरवाणा होता. वाचा- ‘तू आम्हाला हवा आहेस!’, IPL लिलावाआधीच लागली युवराज सिंगवर बोली संधूला रनआऊट करण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाकडून करण्यात आला. मात्र क्रिझच्या आत असूनही संधूचा पाय आणि बॅट हवेत होती, त्यामुळं त्याला बाद जाहीर करण्यात आले. संधू बाद झाल्याचा फटका संघाला बसला, या रन आऊटमुळे संघाला सामना गमवावा लागला. संधू बाद झाला तेव्हा त्याचा संघ अडचणीत होता. मात्र त्याच्या या एका चुकीमुळे त्याच्या संघाला पराभव सहन करावा लागला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाद झाल्यानंतर संधू डोक्यावर हात मारत बाहेर गेला. वाचा- क्रिकेटमधील नवं वादळ! 4 सामन्याच्या बंदीचा काढला राग; 9 चेंडूत केल्या 46 धावा
वाचा- क्रिकेटपटूचं आडनाव आहे की बारा डब्ब्यांची गाडी! बघा तुम्हाला तरी वाचता येतंय का? दिग्गजांनी संधूला घेतले फैलावर विचित्र प्रकारे संधू बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. तर, समालोचक आणि माजी दिग्गज फलंदाज एलान बॉर्डर यांनी संधूवर जहरी टीका केली. बॉर्डर यांनी, “स्वत:ला सुधार संधू. तु एका बावळट क्रिकेटपटू आहेस. तु निराश आहेस, असेलही पाहिजे. हा निव्वळ मुर्खपणा होता. असा मुर्खपणा कोणत्या 10 वर्षांच्या खेळाडूनं केला तर त्याला धरून मारलं पाहिजे”, अशा शब्दात त्याला फैलावर घेतले.