JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO - Boxing करताना रिंगमध्येच आला Heart attack; कधीच पराभव न झालेला तरुण Boxer Musa Yamak ला मृत्यूने हरवलं

VIDEO - Boxing करताना रिंगमध्येच आला Heart attack; कधीच पराभव न झालेला तरुण Boxer Musa Yamak ला मृत्यूने हरवलं

कोणतीच स्पर्धा न हरलेल्या या तरुण बॉक्सरच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे : मृत्यू कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. एका प्रसिद्ध बॉक्सरचाही फाइटिंगदरम्यान मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध बॉक्सर मुसा यमकला बॉक्सिंग करतानाच हार्ट अटॅक आला (Boxer Musa Yamak died) तो तिथंच कोसळला आण त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. टर्कीश-जर्मन बॉक्सर मुसा 38 वर्षांचा होता. आतापर्यंत जितक्या स्पर्धा झाला त्या स्पर्धेत रिंगमध्ये बॉक्सिंग करताना तो कधीच हरला नाही. पण याच रिंगमध्ये मृत्यूने त्याच्यावर मात केली. मृत्यूसमोर तो हरला. रिंगमध्ये फाइट करताना अचानक तो बेशुद्ध झाला. त्यानंतर तो उठलाच नाही. त्याचा मृत्यू झाला. जर्मनीत झालेल्या या बॉक्सिंगमध्ये मुसासमोर युगांडाचा हमजा वांडेरा होता.  स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू तेव्हाच मुसाला एक तीव्र झटका आला. त्यानंतरही त्याने तिसऱ्या टप्प्यात लढण्याचा प्रयत्न केला. पण तिसरा राऊंड सुरू होण्याआधीच तो अचानक बेशुद्ध झाला आणि रिंगमध्येच कोसळला. त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले पण त्याचा जीव वाचवता आला नाही. हे वाचा -  Shocking Video! लग्नात नाचता नाचता अचानक गेला व्यक्तीचा जीव; कॅमेऱ्यात कैद झाला ‘मृत्यू’ मुसाच्या करिअरमधील ही नववी प्रोफेशनल स्पर्धा होती. जी त्याच्या आयुष्यातीलही त्याची शेवटची स्पर्धा ठरली.

संबंधित बातम्या

मुसाच्या या शेवटच्या स्पर्धेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. @CyprusNik ट्विटर अकाऊंटवर हा पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ. ज्यात मुसा फाइटआधीच कोसळताना दिसतो. तुर्कस्तानाच्या अधिकाऱ्यांनीही मुसाच्या निधनाची पुष्टी केली आहे. हसन तुरान यांनी दिलेल्या माहितीनुसार एशिअन आणि युरोपियन चॅम्पियनशिपचा किताब पटकावणारे मुसा आता आपल्यात राहिला नाही. हार्ट अटॅकमुळे कमी वयातच त्याचं निधन झालं आहे. हे वाचा -  ‘सीपीआर दिला, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण…’, असे होते Andrew Symonds चे अखेरचे क्षण मुसाने 2017 साली बॉक्सिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. गेल्या वर्षीच त्याने WBFed आंतरराष्ट्रीय किताब पटकावला आणि तो जगात प्रसिद्ध झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या