मुंबई, 9 जुलै : पाकिस्तानचा क्रिकेटपटू कमरान अकमल (Kamaran Akmal) पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याच्या घरातील महागडा बकरा चोरीला गेला आहे. हा बकरा त्यानं बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणला होता. पण लाहोरमधील त्याच्या घरातून बकऱ्याची चोरी झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली आहे. यंदा 10 जुलै रोजी बकरी ईद साजरी होणार आहे. अकमलच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एकूण 6 बकरे कुर्बानीसाठी आणले होते. त्यामधील सर्वात महागड्या बकऱ्याची चोरी झाली आहे. चोरीला गेलेल्या बकऱ्याची किंमत तब्बल 90 हजार इतकी आहे. ‘रात्री 3 वाजता सोसायटीचे गार्ड झोपलेले असताना या बकऱ्याची चोरी झाली असावी’, असं अकमलनं सांगितलं. या प्रकरणातील दोषींना लवकरच पकडलं जाईल आणि बकरा सुखरूप घरी घेऊन येऊ असं आश्वासन कमराननं आपल्याला दिलं असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. कमरान अकमल हा पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या दरम्यान त्याला खालच्या श्रेणीत टाकण्यात आले त्यावेळी त्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर खराब फिल्डिंग केल्याबद्दलबही त्याच्यावर अनेकदा टीका झाली आहे. IND vs ENG : सीनियर खेळाडूंच्या कमबॅकने वाढलं कॅप्टनचं टेन्शन, रोहित कशी निवडणार Playing XI अकमलनं पाकिस्तानकडून 53 टेस्ट, 157 वनडे आणि 58 टी20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत. त्यानं टेस्टमध्ये 2648, वन-डेमध्ये 3236 तर टी20 इंटरनॅशनलमध्ये 987 रन केले असून तो 2017 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे.