Ravi Shastri
नवी दिल्ली, 23 डिसेंबर: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India vs South Africa) 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. 3 टेस्टला सुरुवात होण्यापुर्वी, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांनी टीम इंडियाबद्दल एक मोठी गोष्ट बोलले आहेत. सीरीजपूर्वी ब्रॉडकास्टरने एक मजेदार प्रोमो शेअर केला आहे. ‘पहली का प्यासा’ या शीर्षकासह रिलीज झालेल्या प्रोमोच्या सुरुवातीच्या भागात रवी शास्त्री दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाच्या मोठ्या कामगिरीबद्दल सांगत आहेत आणि शेवटी ऑस्ट्रेलियाला टोमणे मारताना दिसत आहेत. 45 सेकंदाच्या या प्रोमोच्या सुरुवातीला रवी शास्त्री किचनमध्ये सूप बनवताना दिसत आहेत. तुम्ही मला पहिल्यांदाच या अवतारात पाहत आहात, असे ते स्वतः व्हिडीओमध्ये सांगतात. इतकेच नाही तर ब्रॉडकास्टरने दिलेल्या मजेदार कॅप्शनच्यामागचे रहस्यदेखील उलगडतात.
1992 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये पहिली कसोटी खेळली होती. तेव्हा एक तरुण खेळाडू त्या संघाचा भाग होता. त्यांचा हा इशारा स्वतःसाठी होता. त्यानंतर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकामध्ये मिळवलेल्या पहिल्या विजयाचा संदर्भ देतात. आणि जे आत्तापर्यंत झाले नाही ते सांगतात. भारताने अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण या टीमने यापूर्वीही अनेक वेळा ‘First Ka Thirst’ दाखवली आहे. खात्री नसेल तर ऑस्ट्रेलियाला विचारा. शास्त्री यांचा रोख 2018-19 मध्ये त्यांच्या घरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेतील विजयाकडे आहे. रिपोर्ट्सनुसार, रवी शास्त्री दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत समालोचन करताना दिसतील. रवी शास्त्रींनी 7 वर्ष भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी रवी शास्त्री एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ओळखले जात असायचे. नोव्हेंबरमध्ये टी20 वर्ल्डकप संपल्यानंतर शास्त्रींचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील कार्यकाळ संपला होता.