JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: यंदा आयपीएलमध्ये पहिल्यांदा होतेय ही गोष्ट, 8 ऑक्टोबरला घडणार इतिहास

IPL 2021: यंदा आयपीएलमध्ये पहिल्यांदा होतेय ही गोष्ट, 8 ऑक्टोबरला घडणार इतिहास

IPL 2021 च्या या मोसमातील अखेरचे दोन सामने संध्याकाळी साडेसात वाजता एकाच वेळी खेळले जाणार आहेत. आयपीएलमध्ये एकाच वेळी दोन सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जाहिरात

आयपीएल 2021 या मोसमातील अखेरचे दोन सामने संध्याकाळी साडेसात वाजता एकाच वेळी खेळले जाणार.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: आयपीएल 2021 (IPL 2021 Latest Update) मधील उर्वरीत सामने बीसीसीआयने (BCCI Latest News) भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजीत केले आहेत. दरम्यान, क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. या मोसमातील अखेरचे दोन सामने संध्याकाळी (Final two league fixtures to be played simultaneously) साडेसात वाजता एकाच वेळी खेळले जाणार आहेत. आयपीएलमध्ये एकाच वेळी दोन सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. या मोसमातील शेवटचे दोन सामने संध्याकाळी साडेसात वाजता एकाच वेळी खेळले जातील. हे दोन्ही सामने 8 ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत. हा सामना सनरायझर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्स (Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore Vs Delhi Capitals)  यांच्यात होणार आहे. हे वाचा-   मिताली राजने गमावले अव्वल स्थान; मात्र झूलन गोस्वामीला मिळाली खूशखबर बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

लीग स्टेजच्या शेवटच्या दिवशी, एक दुपारचा सामना आणि एक संध्याकाळचा सामना न करता, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असे दोन सामने एकाच वेळी संध्याकाळी 7.30 वाजता खेळले जातील. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या वृत्ताची माहिती दिली आहे. हे वाचा-  मॉर्गनला आवडली नाही अश्विनची ‘ती’ गोष्ट, कार्तिकनं सांगितलं वादाचं कारण आयपीएलचा सध्याचा हंगाम भारतात खेळला जात होता, परंतु मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघांमध्ये करोना संसर्गाचे प्रकरणे आढळेले होते. या कारणास्तव लीग पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल आयोजित केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या