मुंबई, 15 मे : आयपीएलनंतर आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा क्रिकेटच्या पंढरीत रंगणार आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत यंदा दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतात सध्या लोकसभेची रणधुमाळी आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता देशातील सरकार आणि भारताची वर्ल्ड कपमधील कामगिरी यांचा संबंध दिसून आला आहे. यामध्ये जेव्हा देशात काँग्रेस सत्तेवर होतं तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ज्यावेळी एनडीए सरकार होतं त्यावेळी भारताला विश्वविजेता होता आलं नाही. भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये वर्ल़्ड कप जिंकला होता. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते. भारताने केलेल्या फक्त 183 धावा केल्या असतानाही बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं. या विजयानंतर देशात क्रिकेटची लोकप्रियता वाढली. वर्ल्ड कप जिंकलेला संघ मायदेशी परतल्यानंतर विजेत्या संघातील खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकारी निवासस्थानी खेळाडूंचा सन्मानही केला होता. 1983 नंतर 2003 मध्ये दुसऱ्यांदा विजेता होण्याची संधी भारताला मिळाली होती. या वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकर फॉर्ममध्ये होता. भारताने फायनलला सहज प्रवेश मिळवला होता. त्यावेळी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात झालेल्या या वर्ल्डकपमध्ये भारताचे विश्वविजेता होण्याचं स्वपं भंगलं होतं. दुसऱ्या विजेतेपदासाठी भारताला दोन तप वाट बघावी लागली. देशातील राजकारणातही उलथापालथ झाली होती. त्याशिवाय क्रिकेटमध्येही 50 षटकांच्या जागी टी20 च्या सामन्यांना सुरुवात झाली होती. देशात युपीए सरकारमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते. संघात नव्या खेळाडूंना स्थान दिलं होतं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या या सामन्यात जोगिंदर शर्माचं षटक ऐतिहासिक क्षणांमध्ये नोंदवलं गेलं. वाचा : World Cup : आपल्याच देशाविरुद्ध खेळून ‘हा’ ठरला होता सामनावीर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने जवळपास सर्व विक्रमांची नोंद नावावर केली होती. त्यात कमी होती ती वर्ल्ड कप जिंकण्याची. 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाची सल मनात होती. त्यानंतर आठ वर्षात देशातील राजकारण आणि क्रिकेट दोन्हीतही बराच बदल झाला होता. मनमोहन सिंग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. भारताचे एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न साकार झालं. या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केलं होतं. या सामन्याला तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग स्वत: उपस्थित होते. वाचा : दोन धावा का घेता आल्या नाही, शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा 2011 नंतर 2014 मध्ये देशात सत्ता परिवर्तन झालं. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर 2016 ला झालेल्या टी20 त सुद्धा भारताला विजेता होता आलं नाही. आताही वर्ल्ड कपच्या आधी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आतापर्यंतचे देशातील राजकारण आणि भारताची क्रिकेट वर्ल्ड कपमधील कामगिरीचा हा अनोखा योगायोग यावेळी बदलणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!