लंडन, 2 जून : इंग्लंडचा स्पिन बॉलर जॅक लीच (Jack Leach Injured) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या लॉर्ड्स टेस्टमधून (England vs New Zealand) बाहेर झाला आहे. बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना लिचचं डोकं मैदानात आपटलं, यानंतर लगेच इंग्लंडची मेडिकल टीम लिचवर प्रथमोपचार करण्यासाठी मैदानात आली, पण दुखणं थांबत नसल्यामुळे लिच या टेस्टला मुकणार आहे, त्याच्याऐवजी मॅट पार्किनसन कनकशन सबस्टिट्यूट असणार आहे. मॅचच्या सहाव्या ओव्हरमध्ये बाऊंड्री लाईनवर बॉल अडवताना लिच डोक्यावर पडला. लेग स्पिनर मार्क पार्किनसन गुरूवारी मॅनचेस्टरहून लंडनला येऊन टीममध्ये सामील होईल, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. इंग्लंडच्या घोषित केलेल्या 13 सदस्यांच्या टीममध्ये दुसरा कोणताही स्पिनर नव्हता. कनकशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार ज्या प्रकारच्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली असेल, तशाच प्रकारचा खेळाडू कनकशन सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरू शकतो. या कारणासाठी पार्किनसनला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.
पार्किनसनने अजून एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही, पण तो मागच्या इंग्लंड टीमचा भाग होता. याशिवाय त्याने 9 लिमिटेड ओव्हर मॅच खेळल्या आहेत. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांचा फक्त 132 रनवर ऑल आऊट झाला. जेम्स अंडरसन आणि मॅटी पॉट्स यांना प्रत्येकी 4-4 विकेट मिळाल्या. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन डि ग्रॅण्डहोमने सर्वाधिक 42 रन केले.