लंडन, 2 जून : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand 1st Test) यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नला (Shane Warne) अनोखी श्रद्धांजली देण्यात आली. मॅचच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडची बॅटिंग सुरू असताना 23व्या ओव्हरनंतर 23 सेकंद मॅच थांबवण्यात आली. मॅच थांबवली तेव्हा इंग्लंड आणि न्यूझीलंडचे खेळाडू तसंच मैदानातल्या दर्शकांनीही उभं राहून टाळ्या वाजवल्या. शेन वॉर्न 23 नंबरची जर्सी घालायचा, त्यामुळे 23 ओव्हरनंतर मॅच थांबवण्यात आली आणि 23 सेकंद टाळ्या वाजवण्यात आल्या. शेन वॉर्नचं 4 मार्चला थायलंडमध्ये निधन झालं. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टीसाठी गेला होता. जगातला सगळ्यात महान लेग स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्नच्या नावावर 708 टेस्ट विकेट आहेत. 1999 साली वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये शेन वॉर्न होता.
लॉर्ड्सच्या मैदानात मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ क्लिप चालवण्यात आली, याला रिमेम्बरिंग शेन वॉर्न असं शिर्षक देण्यात आलं होतं. वॉर्नच्या क्रिकेटमधल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्काय स्पोर्ट्सने कॉमेंट्री बॉक्सनं नाव बदलून शेन वॉर्न कॉमेंट्री बॉक्स केलं. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांचा फक्त 132 रनवर ऑल आऊट झाला. जेम्स अंडरसन आणि मॅटी पॉट्स यांना प्रत्येकी 4-4 विकेट मिळाल्या. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन डि ग्रॅण्डहोमने सर्वाधिक 42 रन केले.