दुबई, 08 ऑक्टोबर: आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup ) भारतात खेळला जाणार होता, पण कोरोनाच्या (Corona) कारणास्तव त्याचे आयोजन यूएई (T20 World Cup in UAE) आणि ओमानमध्ये केले गेले आहे. मात्र, त्याचे संपूर्ण आयोजन भारताकडे आहे. दरम्यान, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने नापाक कृत्य (Pakistan T20 WC jerseys sport UAE 2021 instead of India 2021) केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात नवा वाद उद्भवला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत बाबरने पाकिस्तान संघाची जर्सी घातलेली आहे आणि जर्सीवर विश्वचषक आयोजक भारत लिहिण्याऐवजी यूएई लिहिले गेले आहे.
आयसीसीच्या नियमांप्रमाणे विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांना जर्सीच्या उजव्या बाजूला स्पर्धेचे नाव आणि आयोजकांचे नाव त्यांच्या जर्सीवर लिहावे लागते. पण गुरुवारी व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पाकिस्तानची जर्सी पूर्णपणे वेगळी पाहायला मिळाली. हे वाचा- T20 World Cup: 13 ऑक्टोबर रोजी होणार टीम इंडियात मोठा बदल, BCCI नं केली घोषणा पाकिस्तानने त्यांच्या जर्सीवर ‘आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक भारत’ असे लिहिणे अपेक्षित होते. पण त्यांनी ‘आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक यूएई’ असे लिहिलेले दिसत आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराचे विश्वचषक जर्सीमधील फोटो व्हायरल झाले असले तरीही, अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे विश्वचषकासाठी त्यांच्या संघाची जर्सी लॉन्च केलेली नाही.
दरम्यान, काही संघांनी त्यांची जर्सी लॉन्च केली आहे, यामध्ये स्कॉटलँड आणि नेदरलँड यांचा समावेश आहे. या दोन्ही संघांनी त्यांच्या जर्सीवर आयोजकांच्या रूपात भारताचे नाव लिहिले आहे. जर पाकिस्तान विश्वचषकात सध्या व्हायरल झालेल्या जर्सीसोबत सहभागी झाला, तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात आणि आयसीसी त्यांच्यावर कारवाईही करू शकते. हे वाचा- एकाच वेळी होणार 2 मॅच, MI vs SRH आणि RCB vs DC चा मुकाबला इथे पाहता येणार टी20 विश्वचषकाची सुरुवात 17 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारतापुढे पाकिस्तानचे आव्हान असणार आहे.