बर्मिंगहम, 04 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये भारतानं 13 गुणांसह सेमीफायनलला धडक मारली आहे. आता भारताचा एक सामना बाकी असून 6 जुलैला लंकेशी लढत होणार आहे. भारताच्याआधी ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे 14 गुण झाले आहेत. पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीच्या निकालावर सेमीफायनलमध्ये कोणाची लढत कोणासोबत होणार हे स्पष्ट होईल. सध्या इंग्लंड तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे साखळी फेरीतील सामने संपले आहेत. इंग्लंड तिसऱ्या तर चौथ्या स्थानावर न्यूझीलंड निश्चित आहे. सेमीफायनलमध्ये गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना चौथ्या क्रमांकावरील संघाशी होतो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये दुसरी सेमीफायनलची लढत होईल. सध्या गुणतक्त्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांचा एक सामना शिल्लक आहे. यात दोन्ही संघ जिंकले किंवा पराभूत झाले तरी ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानीच राहतील. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये आमने-सामने येणार नाहीत. World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार! भारत पहिल्या क्रमांकावर राहिला तर चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे आव्हान भारतासमोर असेल. न्यूझीलंडविरुद्ध भारताची लढत होण्याची शक्यता आहे. भारताने शेवटचा सामना जिंकला तर भारताचे 15 गुण होतील. मात्र ऑस्ट्रेलिया पराभूत झाली तर त्यांचे 14 गुण राहतील. यामुळे भारत पहिल्या स्थानावर राहिल आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडशी पहिल्या क्रमांकावरील भारताशी होईल.
भारताचा पुढचा सामना लंकेशी आहे. यात भारत विजयी झाल्यास 15 गुण होतील. तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यास त्यांचे 16 गुण होतील. यामुळे भारत दुसऱ्या स्थानावरच राहिल. तसेच झाल्यास तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी भारताची सेमीफायनल लढत होईल. सध्या इंग्लंड तिसऱ्या स्थानावर असून त्यांचे सर्व सामने झाले आहेत. साखळी फेरीतील उर्वरीत लढतीत कोणताही संघ जिंकला किंवा पराभूत झाला तरी इंग्लंडचे स्थान बदलणार नाही. त्यांचे 12 गुण झाले असून चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचे 11 गुण झाले आहेत. यामुळे दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघाची सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी लढत होईल. जर भारत दुसऱ्या स्थानी राहिला तर पुन्हा इंग्लंडविरुद्ध भारताला भगवी जर्सी घालण्याची शक्यता आहे. मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा? साखळी फेरीत भारताने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भगव्या रंगातील जर्सी घातली होती. दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असेल तर एका संघाला वेगळ्या रंगातली जर्सी घालण्याची पद्धत फूटबॉलमध्ये वापरली जाते. होम आणि अवे असं त्याचं स्वरुप असतं. त्याच धर्तीवर आयसीसीने क्रिकेटमध्ये हा प्रयोग केला आहे. याआधीच्या काही सामन्यात इतर संघांना जर्सी वेगळ्या रंगाची घालावी लागली आहे. SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?