JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : इंग्लंडने रचलाय 'कट', कसा सामना करणार भारत?

World Cup : इंग्लंडने रचलाय 'कट', कसा सामना करणार भारत?

ICC Cricket World Cup 2019 : आतापर्यंत भारताचे वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी चार सामने झाले असून 30 जूनला इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 21 जून : ICC Cricket World Cup मधील निम्मे सामने झाले आहेत. भारताशिवाय इतर संघांचे पाच किंवा सहा सामने झाले आहेत. भारत पाचवा सामना अफगाणिस्तानविरुद्ध असून त्यानंतर वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि बांगलादेश, श्रीलंकेविरुद्ध सामने होणार आहेत. यातील सर्वात बर्मिंगहमवर होणारा इंग्लंडविरुद्धचा सामना महत्त्वाचा सामना मानला जात आहे. इंग्लंजमधील दहा शहरांत आणि 11 मैदानावर सामने होत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात जिथं सामना होणार आहे तिथं पहिला सामना 19 जूनला झाला. सर्वात कमी धावसंख्येचा आणि शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना होता. यात न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनने शतक लगावले होते. बर्मिंगहमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. वर्ल्ड कपमधील बहुतांश खेळपट्ट्या या सपाट आहेत. बुमराहने गोलंदाजांसाठी चांगल्या खेळपट्ट्या नसल्यानं नाराजी व्यक्त केली होती. ज्या संघांची वेगवान गोलंदाजी घातक मानली जात आहे त्यात इंग्लंडचा समावेश आहे. जोफ्रा आर्चर हा फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या सामन्याआधी आणखी एक सामना बर्मिंगहमहवर होणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 26 जूनला सामना होणार आहे. ती मॅच दुसऱ्या खेळपट्टीवर होईल तर त्यानंतर भारताचा सामना 19 जूनला झालेल्या खेळपट्टीवर खेळवण्यात येईल. असे झाल्यास भारतीय फलंदाजांना मोठं आव्हान असेल. भारताला या मैदानावर आणखी एक सामना खेळायचा आहे. तो बांगलादेशविरुद्ध असेल. पण बांगलादेशच्या आणि इंग्लंडच्या गोलंदाजीत खूप मोठा फरक आहे. शनिवारी भारताचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. साऊथॅम्पटनची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली आहे. त्यानंतरचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामनासुद्धा फलंदाजीला पोषक अशा मँचेस्टरच्या खेळपट्टीवर होणार आहे. इंग्लंड वगळता भारताच्या इतर सर्व सामन्यासाठी फलंदाजीसाठी उपयुक्त अशी खेळपट्टी असणार आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असेल. हा फक्त योगायोग आहे की इंग्लंडने यजमान असल्याचा फायदा घेत क्युरेटरना काही टिप्स दिल्या आहेत अशी चर्चा सुरू आहे. वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल वाचा- …म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला सानियासाठी ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या