विम्बल्डन, 2 जुलै: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) नंतर टीम इंडियाचे खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. ऋषभ पंत (Rishabh Pant) काही दिवसांपूर्वी युरो कप स्पर्धेतील (Euro 2020) इंग्लंड विरुद्ध जर्मनी मॅचच्या दरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) त्यांच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये फिरत आहेत. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) हे या सुट्टीच्या दरम्यान विम्बल्डन स्पर्धेतील मॅच पाहण्यासाठी गेले होते. शास्त्री यांनी रॉजर फेडररची (Roger Federer) दुसऱ्या फेरीतील मॅच पाहिली. वर्ल्ड नंबर 8 रॉजर फेडरची लढत रिचर्ड गास्केटशी होती. फेडररनं ही लढत 7-6,6-1,6-4 अशा सरळ तीन सेटमध्ये जिंकली. फेडररने विम्बलडन स्पर्धेचे आठ वेळा विजेतेपद पटकावले असून तो यंदा नवव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे. या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने मागील महिन्यात फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. रवी शास्त्रींनी या मॅचपूर्वी सेंटर कोर्टवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. “सूर्यप्रकाश असताना विम्बल्डनमध्ये आल्याचा आनंद आहे. सेंटर कोर्ट छान दिसत आहे.” अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.
सचिन - विराटचा जुना व्हिडीओ विम्बल्डन स्पर्धा पाहण्यासाठी दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित असतात. यावर्षी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयोजकांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यांचा एक मॅच पाहतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. IND vs SL: क्वारंटाइन संपल्यानंतर टीम इंडियानं असं केलं एन्जॉय, पाहा पूल पार्टीचे PHOTOS या दोघांनी 2015 साली एकत्र विम्बल्डन स्पर्धेतील मॅच पाहिली होती. त्यावेळी सचिनसोबत त्याची पत्नी अंजली तर विराट सोबत त्याची अनुष्का शर्मा उपस्थित होती.