मुंबई, 29 मे : क्रिकेट मॅचमध्ये सिक्स, फोर आणि विकेट्सचा थरार नेहमीच पाहयला मिळतो. त्यामुळे फॅन्सचे चांगलेच मनोरंजन होते. मॅचमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या रेकॉर्डचीही चांगलीच चर्चा होते. पण, कधी-कधी मॅचमध्ये खेळण्याच्या नादात खेळाडूंच्या बाबतीत काही गमतीशीर प्रसंग घडतात. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विटालिटी ब्लास्ट (Vitality Blast) स्पर्धेतही या प्रकारचा एक प्रसंग घडला. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची चांगलीच फजिती झाली. विटालिटी ब्लास्ट स्पर्धेत इंग्लंडमधील कौंटी टीममध्ये टी20 सामने होतात. या स्पर्धेतील लँकशायर विरूद्ध यॉर्कशायर मॅचमध्ये हा प्रकार घडला. या मॅचच्या शेवटच्या टप्प्यात यॉर्कशायरचा बॅटर शादाब अहमद मोठा सिक्स लगावून टीमला विजयी करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी रिचर्ड ग्लीसननं टाकलेला बॉल त्याला नीट मारता आला नाही आणि तो हवेत उंच उडला.
बॉल हवेत उंच उडालेला पाहून लँकशायरचा कॅप्टन आणि दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेन विलास कॅच पकडण्यासाठी पळाला. त्यानं डाईव्ह मारत कॅच घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानं शादाबला जीवदान मिळालं. त्याचवेळी कॅच घेण्याच्या गडबडीत डॅनची पँट घसरली. त्यानंतर डेननं पँट सावरली आणि बॉल थ्रो केला. लाईव्ह मॅचमध्ये घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. IPL मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका, ICC नं दिला गंभीर इशारा या मॅचमध्ये लँकशरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 183 रन केले. लँकशरकडून फिल सॉल्टनं सर्वात जास्त 59 रन केले. तर टीम डेव्हिडनं 18 बॉलमध्ये 35 रनची वादळी खेळी केली. यॉर्कशरकडून हॅरीस राऊफ आणि जॉर्डन थॉम्पसननं 2-2 विकेट्स घेतल्या. यॉर्कशरकडून टॉम कोहलरनं 67 आणि हॅरी ब्रूकनं 72 रन करत हा सामना बरोबरीत सोडवला.