मुंबई, 2 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन बलाढ्य टीम अंडर 19 वर्ल्ड कपमधील (Under 19 World Cup) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आज (बुधवारी) आमने-सामने येतील. ही स्पर्धा 4 वेळा जिंकणाऱ्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा 45 रननं पराभव करत स्पर्धेची जोरदार सुरूवात केली. त्यानंतर भारतीय टीममधील अनेक खेळाडू कोरोनानं संक्रमित झाले. कोरोना हल्ल्यानंतरही टीमनं एकजूट दाखवत आयर्लंड आणि युगांडाचा मोठा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत केले. आता भारताकडे संपूर्ण क्षमतेची टीम आहे. टीम इंडियाकडे हरनूर सिंह, अंगकृष सिंह, राज बावा, यश ढूल आणि शेख राशिद हे बॅटर आहेत. तर बॉलिंगमध्ये रवी कुमारनं बांगलादेश विरूद्ध 14 रन देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर विकी ओस्तवाल, कौशल तांबे आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्या बॉलिंगकडेही सर्वांचं लक्ष असेल. दोन वेळेसची चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टीम देखील या स्पर्धेत फॉर्मात आहे. त्यांनी पाकिस्तानचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव केला होता. त्यांची ओपनिंग जोडी फॉर्मात आहे. पाकिस्तान विरूद्ध त्यांनी 71 बॉलमध्ये 97 रनची भागिदारी केली होती. भारतीय बॉलर्समा ही जोडी लवकर फोडावी लागेल. या मॅचमधील विजेता फायनलमध्ये इंग्लंड विरूद्ध खेळणार आहे. इंग्लंडनं अफगाणिस्तानला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. IPL Auction 2022 : श्रेयस अय्यरसाठी ‘या’ टीमचे 20 कोटींचे बजेट! माजी क्रिकेटपटूचा दावा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना किती वाजता सुरू होणार? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कुठे होईल? भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना अँटीगामध्ये होणार आहे. भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल? भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येऊ शकेल. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचे Live Streaming कुठे पाहता येईल? भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचे Live Streaming हॉटस्टारवर पाहता येईल भारतीय टीम : यश ढूल (कॅप्टन), शेख राशिद (उप कप्तान), आराध्य यादव, दिनेश बाना, राज बावा, अनिश्वर गौतम, राजवर्धन हंगरगेकर, हरनूर सिंह, मानव पारख, विक्की ओस्तवाल, अंगकृष रघुवंशी, रवी कुमार, गर्व सांगवान, सिद्धार्थ यादव, निशांत सिंधू, कौशल तांबे आणि वासू वत्स.