JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / KL Rahul - Athiya shetty लवकरच करणार लग्न! मुंबईत होणार जंगी विवाह

KL Rahul - Athiya shetty लवकरच करणार लग्न! मुंबईत होणार जंगी विवाह

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्न करणार आहे. राहुल आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) बऱ्याच काळापासून रिलेशशिपमध्ये आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्न करणार आहे. राहुल आणि आथिया शेट्टी  (Athiya Shetty) बऱ्याच काळापासून रिलेशशिपमध्ये आहेत.  आथिया नुकतीच जर्मनीहून परतलीय. राहुल त्याच्या सर्जरीसाठी जर्मनीत गेला होता. या सर्जरीमुळे तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरूद्धची सीरिज खेळू शकला नाही. तसंच आगामी आशिया कप स्पर्धेतही खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी राहुल फिट होणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याला खेळवण्याची कोणतीही घाई टीम मॅनेजमेंट करणार नाही. ‘इंडिया टुडे’ नं दिलेल्या वृत्तानुसार राहुल आणि आथिया शेट्टी आगामी तीन महिन्यांमध्ये मुंबईत लग्न करू शकतात. या वृत्तानुसार आथियानं या लग्नाची तयारी सुरू केलीय. राहुल आणि आथिया त्यांच्या कुटुंबासह नवं घर पाहायला गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या घराच्या रिनोवेशनचं काम सध्या वेगानं सुरू आहे. राहुलनं आयपीएल स्पर्धेत (IPL 2022) दमदार कामगिरी करत 600 पेक्षा जास्त रन केले होते. त्याच्या कॅप्टनसीमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला होता. आथिया शेट्टी ही चित्रपट अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी आहे. आथियाची आजवरची चित्रपट कारकिर्द साधारण आहे. तिनं सलमान खान प्रोडक्शनच्या हिरो या सिनेमातून पदार्पण केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकली नाही. त्यानंतर तिचा अर्जुन कपूरसोबत मुबारकां हा सिनेमा आला होता. तो सिनेमा देखील कमाल करू शकला नाही. दिनेश चंडिमलचा खतरनाक सिक्स, थेट रस्त्यावरच्या मुलावर आदळला बॉल, पाहा VIDEO केएल राहुल हा टीम इंडियाच्या बॅटींगचा प्रमुख आधारास्तंभ आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या राहुलकडून आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठी अपेक्षा आहे. टी20 इंटरनॅशनलमध्ये शतक झळकावणाऱ्या 5 भारतीयांमध्ये त्याचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या