मुंबई, 15 मे : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हा त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. क्रिकेट विश्वातील अनेक रेकॉर्ड नावावर असलेला द्रविड ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ याचे उदाहरण आहे. सोशल मीडियावर सध्या द्रविडचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये द्रविड एका बुक स्टोरमध्ये बसलाय. भारतीय क्रिकेट टीमचा महान कोच त्याचा मोठेपणा कुठेही न मिरवता एका सामान्य वाचकाप्रमाणे एका खुर्चीवरून बसून पुस्तक वाचण्यात गुंग आहे. द्रविडचा हा फोटो पाहून प्रत्येक जण त्याच्या साधेपणामुळे भारावून गेला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांच्या ‘Wrist Assured’ या आत्मचरित्राचे प्रकाशन बेंगळुरूमधील एका पुस्तकाच्या दुकानात करण्यात आले. त्या कार्यक्रमातील हा फोटो आहे. द्रविड शांतपणे या कार्यक्रमात मागच्या खूर्चीवर बसला होता. त्याला त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या मुलीनंही ओळखलं नाही.
काही वेळानं द्रविडला कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी ओळखलं. त्यांनी द्रविडभोवती गर्दी केली. त्यावेळी हा गुंडप्पा विश्वनाथ यांचा कार्यक्रम आहे. कृपया त्यांना महत्त्व द्या, असं द्रविडनं सांगितलं. Andrew Symonds Died: मंकीगेट ते दारूची नशा… वादग्रस्त आयुष्याचा अकाली शेवट आयपीएल स्पर्धेनंतर भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिका होईल. त्या मालिकेपासून द्रविड भारतीय टीमसोबत असेल. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. द्रविड यापूर्वी अंडर 19 भारतीय टीमचाही प्रशिक्षक होता. त्याच्या कार्यकाळात अंडर 19 टीमनं वर्ल्ड कप जिंकला आहे.