JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / India vs Pakistan Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला कधी आणि कुठे पाहता येणार?

India vs Pakistan Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) महामुकाबला आता काही तासांवर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) महामुकाबला आता काही तासांवर आला आहे. 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपनंतर दोन्ही टीम पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. या मॅचसाठी पाकिस्ताननं 12 जणांची संभाव्य टीम जाहीर केली आहे. तर भारतीय टीमची प्लेईंग 11 ऐनवेळी जाहीर करणार असल्याचं कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) स्पष्ट केलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम या वर्ल्ड कपमधील अभियानाची सुरूवात या मॅचनं करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच होणारा हा महामुकाबला जिंकून वर्ल्ड कपची जोरदार सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या मॅचसाठी फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दुबईतील स्टेडियममधील सर्व तिकीटं यापूर्वीच हाऊसफुल झाली आहेत. रविवारी संध्याकाळी होणारा हा महामुकाबला कुठे पाहता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. किती वाजता सुरू होणार मॅच? भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबला 24 ऑक्टोबर रविवारी  दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल. कुठे होणार लाईव्ह प्रसारण? या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? भारत पाकिस्तान मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना या महामुकाबल्याची मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक भारत-पाकिस्तान मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येतील. India vs Pakistan : विराट टॉस जिंकल्यानंतर काय घेणार निर्णय? वाचा दुबईचा Pitch Report भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी पाकिस्तानची 12 जणांची टीम : बाबर आझम (कप्तान), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद रिजवान, इमाद वसिम, मोहम्मद हफीज, शादाब खान, शोएब मलिक, हारिस रऊफ, हसन अली आणि शाहीन अफ्रिदी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या