JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shane Warne Death: बिअर, सिगारेट आणि फुलं... क्रिकेट फॅन्सची लाडक्या वॉर्नला श्रद्धांजली

Shane Warne Death: बिअर, सिगारेट आणि फुलं... क्रिकेट फॅन्सची लाडक्या वॉर्नला श्रद्धांजली

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या (MCG) बाहेर शेन वॉर्नचा (Shane Warne) मोठा पुतळा उभा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन फॅन्स शनिवारी सकाळपासून या पुतळ्याजवळ वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या निधनामुळे (Shane Warne Death) क्रिकेट विश्वात शोकाकूल वातावरण आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या (MCG) बाहेर वॉर्नचा मोठा पुतळा उभा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन फॅन्स शनिवारी सकाळपासून या पुतळ्याजवळ वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली आहे. फॅन्सनी वॉर्नच्या आवडत्या गोष्टी त्याच्या पुतळ्याच्या खाली ठेवून आवडत्या क्रिकेटपटूचे स्मरण केले आहे. शेन वॉर्नचे शुक्रवारी थायलंडमध्ये हार्ट अटॅकनं निधन झालं. तो 52 वर्षांचा होता. वॉर्ननं फॅन्सच्या पुतळ्याच्या खाली बिअर, सिगारेट आणि फुलं ठेवत त्याला श्रद्धांजली वाहिली. यापूर्वी मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियममधील ‘द ग्रेट साऊदर्न स्टँड’ला शेन वॉर्नचं नाव देण्याची घोषणा ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियानं’ केली आहे. वॉर्ननं अ‍ॅशेस सीरिजमध्ये ‘फॉक्स क्रिकेट’साठी कॉमेंटेटर म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यानं ब्रेक घेतला होता. या ब्रेकच्या काळात तो मित्रांसोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी थायलंडमध्ये गेला होता.

संबंधित बातम्या

थायलंड पोलिसांचा खुलासा शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत थायलंड पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. वॉर्नच्या मृत्यूमागे घातपात असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. शेन वॉर्नला त्याच्या मित्रांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. पण, तिथे त्याचे प्राण वाचवण्यात  यश आले, नाही अशी माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. जडेजाचं शेन वॉर्नशी होतं खास नातं, हर्षा भोगलेंनी सांगितला 14 वर्षांपूर्वीचा किस्सा थायलंडमधील पोलीस सिनियर सार्जंट मेजर (Police Senior Sergeant Major) सुपोर्न हेमरुअँगस्री (Suporn Hemruangsree) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न आपल्या मित्रांसह थायलंडला आला होता. शुक्रवारी दुपारी ते विश्रांती घेत होते. बराचवेळ झाल्यानं शेनच्या चार मित्रांपैकी एकानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं प्रतिसाद दिला नाही. मेडिकल सपोर्ट मिळण्यापूर्वी त्याच्या मित्रांनी सुमारे 20 मिनिटं त्याला सीपीआर (CPR) देऊन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला थाई इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये (Thai International Hospital) नेण्यात आलं. प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. द सन ने याविषयी वृत्त दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या