नवी दिल्ली, 4 एप्रिल: न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर रॉस टेलर( Ross Taylor) नँदरलंड विरुद्धच्या सामन्यात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. हेमिल्टनच्या सेडॉन पार्कच्या मैदानात तो अखेरचा सामना (NZ vs NED) खेळण्यासाठी मैदानात उतरला असता त्याला अश्रु अनावर (Emotional Ross Taylor breaks down during national anthem in farewell match) झाले. त्याचा हा भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉस टेलरची पत्नी विक्टोरिया आणि कुटुंबियातील अन्य सदस्यही रॉस टेलरचा 450 आणि अखेरचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर टेलरला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. देशासाठी अखेरचा सामना आणि न्यूझीलंड टीममधील सहकाऱ्यांसोबत मैदानात राष्ट्रगीतसाठी उभा राहण्याची अखेरची वेळ असल्याने तो भावुक झाला.
या फेअरवेल सामन्यात रॉस टेलर तीन मॅकेंजी, जाँटी आणि एडिलेड या तीन मुलांसह राष्ट्रगीतासाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या तिन्ही मुलांनी ब्लॅक कॅप्सचा टी शर्ट घातला होता. या टी शर्टवर रॉस टेलर असे नाव लिहिले होते. किवी संघाने 3 सामन्यांची मालिका आधीच जिंकली आहे. मालिकेत संघ 2-0 ने पुढे असून आता क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टेलर देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. 2020 मध्ये तीनही फॉरमॅटमध्ये 100-100 सामने खेळणारा टेलर जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने न्यूझीलंडकडून 112 कसोटी सामन्यांमध्ये 7 हजार 683 धावा केल्या. ज्यामध्ये 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2022: CSK च्या पराभवानंतर रैनाची चर्चा, टीम मॅनेजमेंटला मिळाली तिसरी वॉर्निंग! त्याने 235 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 हजार 593 धावा केल्या ज्यात 21 शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 102 टी-20 सामन्यात 1909 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याच्या नावावर 7 अर्धशतके आहेत. भारताला पराभूत करून कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनलेल्या न्यूझीलंड संघाचा टेलर देखील एक भाग होता. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत विजयी धावा केल्या. टेलरने त्याच वेळी बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.