JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऐतिहासिक टेस्ट सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

ऐतिहासिक टेस्ट सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानमध्ये टेस्ट मॅच खेळत आहे. दोन्ही देशांमधील पहिली टेस्ट रावळपिंडीमध्ये सुरू झाली आहे. या ऐतिहासिक टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानमध्ये टेस्ट मॅच खेळत आहे. दोन्ही देशांमधील पहिली टेस्ट रावळपिंडीमध्ये सुरू झाली आहे. या ऐतिहासिक टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचे महान विकेटकिपर रॉड मार्श (Rod Marsh) यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. मार्श यांना काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर ते कोमात होते. रॉड मार्श यांनी 1970 ते 84 कालावधीमध्ये 96 टेस्ट खेळल्या. या कालावधीमध्ये त्यांनी स्टंपच्या मागे 355 विकेट्स घेतल्या. जो तेव्हा एक रेकॉर्ड होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन विकेटकिपर इयान हिलीनं (395) हा रेकॉर्ड तोडला. मार्श यांनी 92 वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. आजही सर्वात यशस्वी 5 विकेट किपरमध्ये मार्शचा समावेश होतो. दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचरचं स्टंपच्या मागे सर्वात जास्त 555 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर अ‍ॅडम गिलख्रिस्ट (416), इयान हिली आणि रॉड मार्श यांचा नंबर आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) 294 विकेट्सह पाचव्या क्रमांकावर आहे. मार्श यांच्या निधनानं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. IND vs SL : ‘माझा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता’, 100 वी टेस्ट खेळताना विराट भावुक रॉड मार्श यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तरूण क्रिकेटपटूंचा शोध घेण्याचे काम केले. ते 2016 साली ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

‘रॉड मार्श यांच्या निधनानं आम्हाला तीव्र दु:ख झाले आहे.  जबरदस्त विकेट किपर, आक्रमक बॅटर म्हणून रॉड यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. रॉड यांची पत्नी रॉस, मुलं पॉल, डॅन आणि जॅमी तसंच मित्रपरिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया क्रिकेट ऑस्ट्रेलियानं व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या