JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : जडेजाचं शेन वॉर्नशी होतं खास नातं, हर्षा भोगलेंनी सांगितला 14 वर्षांपूर्वीचा किस्सा

IND vs SL : जडेजाचं शेन वॉर्नशी होतं खास नातं, हर्षा भोगलेंनी सांगितला 14 वर्षांपूर्वीचा किस्सा

रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) मोहाली टेस्टमध्ये शतक झळकावताच सर्वांना ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नची (Shane Warne) आठवण झाली. जडेजा आणि वॉर्न यांच्यात खास नातं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मार्च : टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) मोहाली टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे. जडेजाचं टेस्ट कारकिर्दीमधील हे दुसरं शतक आहे. टीम इंडियाची अवस्था 5 आऊट 228 अशी होती तेव्हा मैदानात आलेल्या जडेजानं 160 बॉलमध्ये 10 फोरच्या मदतीनं शतक झळकावले. त्याच्या शतकानं टीम इंडियानं 450 रनचा टप्पा ओलांडला आहे. जडेजानं मोहाली टेस्टमध्ये शतक झळकावताच सर्वांना ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नची (Shane Warne) आठवण झाली. जडेजा आणि वॉर्न आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये 2008 साली राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीममध्ये एकत्र होते. वॉर्नच्या नेतृत्त्वाखाली राजस्थाननं त्या सिझनचे विजेतेपद पटकावले. राजस्थानच्या विजेतेपदामध्ये जडेजाच्या ऑल राऊंड खेळाचा मोठा वाटा होता. शेन वॉर्नचा एक कॅप्टन म्हणून जडेजावर प्रचंड विश्वास होता. वॉर्ननं त्याचं वर्णन ‘रॉकस्टार’ असं केलं होतं. वॉर्नच्या कॅप्टनसीमध्ये जडेजाचा खेळ बहरला. त्याचा राजस्थानला फायदा झाला. शेन वॉर्नचे शुक्रवारी धक्कादायक निधन झाले. या निधनानंतर क्रिकेट विश्वात शोकाकुल वातावरण आहे. जडेजानंही खास ट्विट करत वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. जडेजाच्या ट्विटला उत्तर देताना क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी 14 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जडेजाची मोहालीमध्ये तलवारबाजी, श्रीलंकेविरूद्ध झळकावली दमदार सेंच्युरी! VIDEO ‘शेन वॉर्नबद्दल समजल्यानंतर धक्का बसला. वॉर्न खूप मोठा खेळाडू होता. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला शांती द्यावे. वॉर्नच्या प्रिय व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.’ असे ट्विट जडेजानं केले. त्याला उत्तर देताना हर्षा भोगले यांनी लिहले की, ‘जड्डू तुझ्यावर त्याचं खूप प्रेम होतं. 2008 साली डीवाय पाटील स्टेडियममधील तो क्षण मला आठवतो. त्याने तुला बोलावले आणि सांगितले की हा मुलगा रॉकस्टार आहे. आम्ही अनेकदा तुझ्याबाबत चर्चा केली आहे. तू आणि युसूफ पठाण त्याचे लाडके होतात.

संबंधित बातम्या

मोहाली टेस्टचा दुसरा दिवस हा शेन वॉर्नच्या आठवणीनं सुरू झाला. शनिवारचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारत आणि श्रीलंका टीमच्या सर्व खेळाडूंनी वॉर्नला श्रद्धांजली वाहिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या