Pic : BCCI Domestic, Twitter
मुंबई, 9 जून : रणजी ट्रॉफी स्पर्धेचं सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईनं वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही टीमला न जमलेली कामगिरी आपल्या मुंबईनं केली आहे. मुंबईनं रणजी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंडचा (Mumbai vs Uttarakhand) 725 रननं पराभव (Mumbai Create World Record) केला. फर्स्ट क्लास क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. मुंबईनं यावेळी ऑस्ट्रेलियन टीम न्यू साऊथ वेल्सचा रेकॉर्ड मोडला. त्यांनी 1929-30 च्या सिझनमध्ये क्वीन्सलँडवर 685 रननं विजय मिळवला होता. मुंबईनं दिलेलं 795 रनचं टार्गेट उत्तराखंडला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम फक्त 69 रन काढून आऊट झाली. या संपूर्ण मॅचवर मुंबईनं वर्चस्व राखलं. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईनं 8 आऊट 647 रन केले होते. त्याला उत्तर देताना उत्तराखंडची इनिंग फक्त 114 रनवर ऑल आऊट झाली. मुंबईनं दुसऱ्या इनिंग 3 आऊट 261 वर घोषित केली होती.
मुंबईच्या धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनुष कोटीयान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहित अवस्थीला एक विकेट मिळाली. उत्तराखंडकडून कुणाल चंडेलानं सर्वाधिक 21 रन केले. त्यांच्या 6 खेळाडूंना दोन अंकी रनही करता आले नाहीत. IND vs SA : राहुलच्या दुखापतीचा कुणाला फायदा? पंत या Playing XI सह मैदानात उतरणार या सामन्यात मुंबईच्या सुवेद पारकरने (Suved Parkar) 10 तास बॅटिंग करून 252 रनची मॅरेथॉन खेळी केली. मुख्य म्हणजे 21 वर्षांच्या सुवेद पारकरचा हा पदार्पणाचाच सामना होता. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात द्विशतक करणारा सुवेद हा 12 वा तर 250 रन करणारा पाचवा खेळाडू ठरला. त्याचबरोबर सर्फराज खाननंही दमदार फॉर्म कायम राखत शतक झळकावलं होतं.