नवी दिल्ली, आयपीएल टी-20 क्रिकेट (IPL 2021) स्पर्धेमध्ये आता रंग भरत आहेत. काही संघांनी पॉइंट्स टेबलमध्ये वरचं स्थान पटकावलं आहे तर काही टीम तळात आहेत. याचवेळी देशात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे सुरक्षिततेची चर्चा होऊ लागली आहे. सुरक्षिततेच्या कारणासाठी अनेक परदेशी खेळाडू परत मायदेशी गेले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर ॲडम झम्पाने आयपीएलमधील बायो बबल असुरक्षित आहे अशी टीका केली होती. पण दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या क्विंटनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) अर्धशतक केलं. त्यानंतर तो म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आमच्या डॉक्टरांवर विश्वास आहे त्यामुळे त्यामुळेच आम्ही बायो बबलमध्ये सुरक्षित आहोत. आम्हाला खूप सुरक्षित वाटतं आणि सगळं सोपं आहे. तरीही कठीण काळ लक्षात घेऊन आम्ही सगळी काळजी घेतो आणि मला बायोबबलमध्ये (Bio Bubble) एकदम सुरक्षित वाटतं. इतर खेळांडूंबद्दल मी काही बोलणार नाही पण मला सुरक्षित वाटतं. बायो बबलमध्ये राहूनही सराव आणि मॅच खेळणं हे अगदी सहजणपणे करता येतं.’ कालच्या त्याच्या खेळाबद्दल तो म्हणाला, ‘चेन्नईपेक्षा दिल्लीतल्या मैदानावर बॅटिंग करणं सोपं होतं. मी रन्स केल्या त्यातून आम्ही मॅच जिंकलो याचा अधिक आनंद आहे.’ (हे वाचा- ‘भारतामध्ये असुरक्षित वाटतं’ या दाव्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूचं 24 तासात घूमजाव! ) राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला, ‘आम्ही 20 ते 25 रन्स अधिक करू शकलो असतो तर बरं झालं असतं. आमचे चांगले बॅट्समन बाद झाल्यामुळे तसं करता आलं नाही तरीही आम्ही विजय मिळवण्यासाठीच प्रयत्नशील होतो. आमचा आमच्या टीमवर आणि खेळाडूंवर विश्वास आहे. आम्हाला कल्पना आहे की हा आमचा कठीण काळ आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, लियाम लिव्हिंगस्टोनसारखे स्टार खेळाडू टीमसोबत नाहीएत तरीही माझ्या टीममधील सगळे अशा वातावरणात सकारात्मक आहेत याचा मला अभिमान वाटतो. उरलेल्या मॅचेसमध्येही आम्ही विजय मिळवण्यावरच लक्ष केंद्रित करू.’ (हे वाचा- IPL 2021: पृथ्वी शॉच्या वादळात कोलकाताची वाताहत, दिल्लीचा KKR वर एकतर्फी विजय ) आयपीएल स्पर्धा 30 मेला संपणार आहे. राजस्थान टीमची आतापर्यंतची कामगिरी पाहता त्यांना अजून खूप चांगला खेळ करावा लागणार आहे. महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नसताना ही कामगिरी ते कसं करतात हे आगामी महिनाभरात दिसेलच.