धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 28 मार्च : क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची लीग असलेल्या आयपीएल स्पर्धेला आता काही दिवसांमध्येच सुरूवात होत आहे. या स्पर्धेत कोणती टीम जिंकणार? ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण पटकावणार? या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमधील मराठी खेळाडू कशी कामगिरी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईकर श्रेयस अय्यरनं या स्पर्धेतून माघार घेतलीय. तर, अजिंक्य रहाणे फॉर्मात नसल्यानं अंतिम टीममध्ये किती खेळेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
आयपीएल स्पर्धेत पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैयसवाल या मुंबईकर खेळाडूंकडं सर्वांचं लक्ष लागलंय. यापैकी पृथ्वी शॉ हा टी20 स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर यशस्वी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पृथ्वी दिल्ली कॅपिटल्ससकडून तर यशस्वी राजस्थान रॉयल्सकडून या स्पर्धेत खेळणार आहे. या दोघांसोबत मुंबईत क्रिकेट खेळलेला खेळाडू वैभव कळंबकरने आपल्या मित्राकडून एक अपेक्षा व्यक्त केलीय.
Congress : काँग्रेसनेही भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्याला संधी
Live Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी
अचलपूरमध्ये धावत्या दुचाकीचा भीषण स्फोट; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी असेल ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Marriage : अरेंज की लव्ह, कोणतं मॅरेज बेस्ट? धक्कादायक आकडेवारी समोर
Weather Update Today : उष्म्यापासून मिळणार का दिलासा? चेक करा संभाजीनगरसह 6 शहरांचं तापमान
Political news : अमित शाहांची सभा नांदेडमध्येच का? चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट!
मोठी बातमी! सुप्रिया सुळे, पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी नाही
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याकडून मोठी अपडेट; समुद्र किनाऱ्यावरील गावांना सर्तकतेचा इशारा
'मनोजसोबत लग्न केलं होतं, पण या कारणामुळे सरस्वतीने घरच्यांपासून लपवलं'
Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने सोसायटीत कसे राहत होते? शेजाऱ्यांनी केला मोठा खुलासा
Video : तापानं फणफणत असतानाही पृथ्वी शॉने जिंकून दिली होती मॅच, पाहा Untold Story
मित्राची इच्छा पूर्ण होणार?
मुंबईकडून अंडर 25 क्रिकेट स्पर्धा खेळलेला वैभव हा पृथ्वी आणि यशस्वीचे कोच राजू पाठक यांच्याकडं क्रिकेटचं प्रशिक्षण घेत आहे. पृथ्वी शॉनं शालेय क्रिकेटमध्ये 546 रनची ऐतिहासिक खेळी केली. त्या खेळीच्या दरम्यान वैभवनं त्याच्यासोबत बॅटींग केलीय. त्याचबरोबर यशस्वीसोबतही तो अनेक मॅच खेळला आहे.
वैभव पृथ्वीला लहानपणापासून ओखळतो. दोघांनी एकत्र क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलंय. 'मला पृथ्वीची बॅटींग खूप आवडते. तो प्रत्येक मॅचमध्ये चांगलं खेळतो. पण, आयपीएलमध्ये त्याला आजवर फारसं यश मिळालेलं नाही. आयपीएलमध्ये भरपूर रन करण्याची माझी इच्छा पृथ्वी यंदा नक्की पूर्ण करेल, असा विश्वास वैभवनं व्यक्त केला.
पाणीपुरी विक्रेता कसा बनला क्रिकेट स्टार? पाहा यशस्वी जैसवालचा प्रेरणादायी प्रवास, Video
यशस्वी जैयस्वालबद्दल बोलताना वैभव म्हणाला की, 'शाळेतील आजचा यशस्वीमध्ये खूप फरक आहे. आज तो एका उंचीवर पोहचलाय. त्यामध्ये अनेकांची मेहनत आहे. यशस्वी सध्या चांगलाच फॉर्मात आहे. या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सला विजेतेपद जिंकून देईल, असं मला वाटतं.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Cricket news, Local18, Mumbai, Prithvi Shaw