मुंबई, 5 मे : लाईव्ह मॅच सुरू असताना प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडिअममध्ये पार्टनरला प्रपोज करण्याचे प्रकार यापूर्वीही आपण पाहिले आहेत. मागील आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chenani Super Kings) फास्ट बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) त्याच्या गर्लफ्रेंडला मॅचच्या दरम्यानच प्रपोज केले होते. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) या मॅचमध्येही असाच एक प्रकार घडला. आरसबी विरूद्ध सीएसके मॅचमध्येही गुडघ्यात वाकून पार्टनरला प्रपोज करण्याचा प्रकार घडला. पण, यावेळी एका मुलीनं तिच्या बॉयफ्रेंडला गुडघ्यात वाकून प्रपोज केलं. सीएसकेची बॅटींग सुरू असताना 11 व्या ओव्हरच्या दरम्यान हा प्रकार घडला. या मुलीनं लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तर तिचा बॉयफ्रेंड आरसीबीच्या जर्सीमध्ये होता. त्या मुलीनं गुडघ्यात सर्वांसमोर गुडघ्यात वाकून बॉयफ्रेंडला प्रपोज केलं. त्यानं तिला हो म्हणतात मुलीनं बॉयफ्रेंडला अंगठीही घातली. यावेळी त्यांचा मित्र परिवारही उपस्थित होता. या अनोख्या प्रपोजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरसीबीने दिलेल्या 174 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 160 रनच करता आल्या. आरसीबीविरुद्धच्या या पराभवासोबतच सीएसकेचं प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचणं आता जवळपास अशक्य झालं आहे, कारण त्यांच्या खात्यात आता 7 पराभव आहेत. आता सीएसकेला उर्वरित चारही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील तसंच अन्य सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागेल. IPL 2022 : CSK च्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, शेवटची आशाही समाप्त तर दुसरिकडं आरसीबीनं या सिझनमधील पाचवा विजय मिळवला आहे. त्यांचे आता 10 पॉईंट्स झाले असून या विजयासह आरसीबीची टीम पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.