JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : RCB च्या विजयाचा हिरो कामगिरीवर समाधानी नाही, स्वत:च सांगितलं कारण

IPL 2022 : RCB च्या विजयाचा हिरो कामगिरीवर समाधानी नाही, स्वत:च सांगितलं कारण

आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्सचा (RCB vs CSK) 13 रननं पराभव केला. सलग तीन पराभवानंतर आरसीबीनं हा विजय मिळवला आहे. या विजयानंतर आरसीबीनं पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर उडी मारली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीची गाडी पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतली आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या मॅचमध्ये आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्सचा (RCB vs CSK) 13 रननं पराभव केला. सलग तीन पराभवानंतर आरसीबीनं हा विजय मिळवला आहे. या विजयानंतर आरसीबीनं पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर उडी मारली आहे. आरसीबीचा फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) या विजयाचा शिल्पकार ठरला. हर्षलनं महत्त्वातच्या 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हर्षल स्वत: या कामगिरीवर समाधानी नाही. त्यानं स्वत: याचं कारण देखील सांगितलं आहे. आरसीबीचा कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिसनं सीएसकेच्या इनिंगमधील शेवटची ओव्हर हर्षलला दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये सीएसकेला विजयासाठी 31 रनची आवश्यकता होती. हर्षलच्या पहिल्या बॉलवर ड्वेव प्रिटोरीयसनं सिक्स लगावला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर हर्षलनं त्याला आऊट केलं. तिसऱ्या बॉलवर महीश तीक्षणानं पुन्हा एक सिक्स लगावला. चौथ्या बॉलवर बायच्या रूपानं चार अतिरिक्त रन मिळाली. पाचव्या बॉलवर एकही रन निघाला नाही. तर शेवटच्या बॉलवर एक रन गेला. हर्षलनं या ओव्हरमध्ये 17 रन दिले. हर्षल का नाराज? हर्षलनं मॅचनंतर बोलताना सांगितलं की, ‘मी या मॅचसह संपूर्ण स्पर्धेत यॉर्कर टाकू शकलेलो नाही. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात मी त्यामध्ये यशस्वी होईन अशी आशा आहे. मी पहिल्या ओव्हरमध्ये स्लो बॉल टाकून विकेटच मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉल बॅटवर सहज येत होता. त्यानंतर मी बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मी दोन डावखुऱ्या बॅटरच्या विरूद्ध चांगली बॉलिंग केली याचं समाधान आहे,’ असंही हर्षलनं सांगितलं. IPL 2022 : CSK च्या ‘फ्लॉप शो’वर कोच फ्लेमिंग नाराज, जाहीरपणे दिली चुकांची कबुली सीएसके विरूद्ध हर्षलनं 4 ओव्हरमध्ये 35 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या. त्यानं रविंद्र जडेजा, मोईन अली आणि ड्वेन प्रिटोरीयस यांना आऊट केलं. हर्षलनं मागच्या आयपीएलमध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या रेकॉर्डची त्यानं बरोबरी केली होती. या सिझनमध्ये त्यानं आत्तापर्यंत 10 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या