मुंबई, 21 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा (Delhi Capitals vs Punjab Kings) एकतर्फी पराभव केला आहे. या विजयासह दिल्लीनं पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर उडी मारली आहे. पंजाबची बॅटींग या मॅचमध्ये फ्लॉप ठरली. त्यांची संपूर्ण टीम 115 रनवरच ऑल आऊट झाली. त्यानंतर दिल्लीनं 116 रनचं आव्हान फक्त 1 विकेट्सच्या मोबदल्यात 10.3 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. पंजाबच्या 4 विकेट्स झटपट गेल्यानंतर शाहरूख खानकडून (Shaharukh Khan) फॅन्सची मोठी आशा होती. शाहरूख यंदा तरी संकटातून वाचवेल ही त्यांची अपेक्षा पुन्हा एकदा फेल गेली. शाहरूख 20 बॉलमध्ये 12 रन काढून आऊट झाला. त्यानं टेस्ट क्रिकेटरला साजेशा 60 च्या स्ट्राईक रेटनं रन केले, या आयपीएल ऑक्शनमध्ये पंजाबनं शाहरूखला 9 कोटींची मोठी किंमत घेऊन खरेदी केले आहे. पण, शाहरूखनं पंजाबची सपशेल निराशा केली आहे. पंजाबचा 7 पैकी 4 मॅचमध्ये पराभव झालाय. या सातपैकी एकाही मॅचमध्ये शाहरूखची बॅट चाललेली नाही. शाहरूखनं 7 मॅचमध्ये 14 च्या सरासरीनं फक्त 98 रन केले आहेत. विशेष म्हणजे आक्रमक बॅटींगसाठी प्रसिद्ध असलेल्या शाहरूखचा स्ट्राईक रेट हा फक्त 100 आहे. सहाव्या नंबरवर खेळायला येणाऱ्या शाहरूखकडून फिनिशर म्हणून पंजाबच्या मोठ्या अपेक्षा आहेत, पण त्यानं अद्याप एकदाही ही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. MI vs CSK Dream 11 Team Prediction: मुंबईला आज शेवटची संधी, ‘या’ खेळाडूंवर आजमवा भविष्य दिल्ली विरूद्ध पंजाबची टीम 20 ओव्हरमध्ये 115 रनवर ऑल आऊट झाली. आयपीएलच्या या मोसमातला हा निच्चांकी स्कोअर आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सचा पंजाब किंग्सविरुद्ध 126 रनवर ऑल आऊट झाला होता. दिल्लीकडून खलील अहमद, ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर मुस्तफिजूर रहमानला एक विकेट घेण्यात यश आलं. पंजाबकडून जितेश शर्माने 23 बॉलमध्ये सर्वाधिक 32 रन केले, तर मयंक अग्रवाल 24 रन करून आऊट झाला.