JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : धोनीनं भर रस्त्यात थांबवली बस, ट्रॅफिक पोलिसांना म्हणाला....VIDEO

IPL 2022 : धोनीनं भर रस्त्यात थांबवली बस, ट्रॅफिक पोलिसांना म्हणाला....VIDEO

आयपीएल 2022 (IPL 2022) ला 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ड्रायव्हर बनला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) ला 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. यंदा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या टीम सहभागी होत आहेत. यंदाच्या सिझनमध्ये 10टीम एकूण 74 सामने खेळणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या स्पर्धेच्या लीग स्टेजमधील 70 सामने मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या आगामी सिझनचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा बस ड्रायव्हर झाला आहे. या प्रोमोमध्ये धोनी बस चालवत असतानाच अचानक ब्रेक दाबून बस थांबवतो. त्यामुळे बसच्या मागे असलेल्या रस्त्यावरची ट्रॅफिक देखील थांबते. धोनी ड्रायव्हिंग सिटवरून उठून मागे येतो आणि बसच्या पाऱ्यांवर बसतो. धोनी हा सर्व खटाटोप आयपीएलची ‘सुपर ओव्हर’ पाहण्यासाठी करतो. ट्रॅफिक पोलीस धोनीला बस का थांबली? असा प्रश्न विचारतो त्यावेळी धोनी त्याला ‘हे टाटा आयपीएल आहे, इथं वेडेपणा स्वाभाविक आहे, असं उत्तर देतो.’ ‘स्टार स्पोर्ट्स’ या आयपीएलच्या ऑफिशियल ब्रॉडकास्टरनं हा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

आयपीएलच्या 10 टीमची 2 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सगळ्या टीम प्रत्येकी 14 मॅच खेळणार आहेत. टीमची विभागणी दोन ग्रुपमध्ये झाली असली तरीही पॉईंट्स टेबल एकच असणार आहे. टॉप-4 टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. प्ले-ऑफचे सामने कुठे होणार, याबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होऊ शकतात. IND vs SL : विराटची 100 व्या टेस्टमध्ये मोठी चूक, विकेट पाहून बसणार नाही विश्वास! VIDEO आयपीएल 2022 साठी ग्रुप-ए मध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, राजस्थान आणि लखनऊ आहेत. तर ग्रुप-बी मध्ये चेन्नई, हैदराबाद, बँगलोर, पंजाब आणि गुजरातचा समावेश करण्यात आला आहे.आयपीएलचा हा 15 वा मोसम आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या