JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबई इंडियन्स कमबॅक करणार! राजस्थानच्या कोचनं व्यक्त केला विश्वास

IPL 2022 : मुंबई इंडियन्स कमबॅक करणार! राजस्थानच्या कोचनं व्यक्त केला विश्वास

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) या आयपीएलमध्ये आजवरची सर्वात निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईनं सलग 6 सामने गमावले असून हा त्यांचा रेकॉर्ड आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल :  मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) या आयपीएलमध्ये आजवरची सर्वात निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईनं सलग 6 सामने गमावले असून हा त्यांचा रेकॉर्ड आहे. यापूर्वी मुंबईनं सलग 5 सामने गमावले होते. अद्याप एकही पॉईंट न कमावलेल्या मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलंय. तरीही मुंबईच्या कामगिरीवर प्रतिस्पर्धी टीमच्या कोचचा विश्वास आहे. राजस्थान रॉयल्सचा फास्ट बॉलिंग कोच लसिथ मलिंगानं (Lasith Malinga) मुंबई इंडियन्स या स्पर्धेत कमबॅक करेल असा विश्वास व्यक्त केलाय. मलिंगा त्याची संपूर्ण आयपीएल कारकिर्द मुंबईकडून खेळला आहे. तो मुंबईचा आजवरचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. मुंबई इंडियन्सची संपूर्ण माहिती असलेल्या मलिंगानं ट्विट करत या अडचणीच्या प्रसंगी त्याच्या जुन्या टीमवर विश्वास व्यक्त केला आहे. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर मलिंगानं हे ट्विट केलं आहे. ‘मुंबईची टीम कमबॅक करण्यासाठी ओळखली जाते. ते यावर्षी ‘प्ले ऑफ’ ला जातील की नाही हे सांगता येणार नाही,पण ते या स्पर्धेचा शेवट नक्कीच जबरदस्त करतील. तो तसाच करावा अशीच इच्छा त्यांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची असेल.’

संबंधित बातम्या

रोहित इमोशनल लखनऊविरुद्ध पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इमोशनल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी याची पूर्ण जबाबदारी घेतो, टीमला माझ्याकडून जी अपेक्षा आहे, त्या मला पूर्ण करता येत नाहीयेत,असं रोहित म्हणाला आहे. SRH vs PBKS : आक्रमक पंजाबला ‘कुल’ हैदराबादचं चॅलेंज, पाहा दोन्ही टीमची संभाव्य Playing11  ‘मी प्रत्येक मॅचआधी जशी तयारी करतो, तशीच आताही करत आहे, पण यावेळी गोष्टी पाहिजे तशा होत नाहीयेत. टीमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही, याची मी जबाबदारी घेतो. गेल्या कित्येक वर्षांपासून मी स्वत:ला पाठिंबा देत मैदानात जाऊन खेळ एन्जॉय करत आहे. पुढचा विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा काही जगाचा अंत नाही, याआधीही आम्ही पुनरागमन केलं, आता पुन्हा तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू,’ असं वक्तव्य रोहितने केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या