JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : धोनीनं कॅप्टनसी सोडताच विराट भावुक, इमोशल पोस्ट शेअर करत म्हणाला...

IPL 2022 : धोनीनं कॅप्टनसी सोडताच विराट भावुक, इमोशल पोस्ट शेअर करत म्हणाला...

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) कॅप्टनसी सोडली आहे. धोनीच्या या निर्णयानं टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच इमोशनल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मार्च : महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) कॅप्टनसी सोडली आहे. त्याने हा निर्णय आयपीएल 2022 स्पर्धा सुरू होण्याच्या 2 दिवस आधी घेतला. धोनीनं टीमचा प्रमुख ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) उत्तराधिकारी केलं आहे. धोनीच्या या निर्णयाचे जोरदार पडसाद क्रिकेट विश्वात उमटले. तो आयपीएल स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं चार वेळा विजेतेपद पटकावलं आहे. धोनीनं 204 मॅचमध्ये चेन्नईची कॅप्टनसी केली. त्यामध्ये 121 मध्ये विजय मिळवला. धोनीपासून अनेक क्रिकेटपटूंनी प्रेरणा घेतली आहे. त्यामध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) समावेश आहे. धोनी हाच माझा नेहमी कॅप्टन असेल असं विराटनं एकदा सांगितलं होतं. धोनीच्या निर्णयानंतर विराट चांगलाच इमोशनल झाला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याची भावना व्यक्त केली आहे. काय म्हणाला विराट? धोनीनं सीएसकेची कॅप्टनसी सोडल्यानंतर आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं एक जुना फोटो शेअर केलाय. तो फोटो शेअर करत विराट म्हणाला की, ‘पिवळ्या जर्सीमधील जबरस्त कॅप्टनसीच्या पर्वाची सांगता. कॅप्टनसीचा हा अध्याय फॅन कधीही विसरणार नाहीत. तुझ्याबद्दल नेहमीच आदर असेल.’ विराटचा हा फोटो फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला झाले.

संबंधित बातम्या

रविंद्र जडेजा यंदा पहिल्यांदा आयपीएल टीमची कॅप्टनसी करणार आहे. जडेजानं 2008 साली राजस्थान रॉयल्सच्या माध्यमातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो कोची टस्कर्स केरळ, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लॉयन्स या टीमकडून खेळला आहे. यापैकी एकाही टीमची त्यानं कॅप्टनसी केलेली नाही. धोनीनं स्वत: जडेजाची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे, असे सीएसकेने स्पष्ट केले आहे. IPL सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी धोनीचा धमाका, CSK च्या कॅप्टनसीचा दिला राजीनामा 2021 मध्ये जडेजा चांगलाच फॉर्मात होता. त्याने 16 मॅचमध्ये 227 रन केले तसंच 13 विकेट्स घेतल्या. तो बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये टीमसाठी योगदान देतो. तसंच सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही फॉर्मात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या