JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : राजस्थानला मिळाला नवा मिस्टर 360, पहिल्याच मॅचमध्ये केली वादळी बॅटींग

IPL 2022 : राजस्थानला मिळाला नवा मिस्टर 360, पहिल्याच मॅचमध्ये केली वादळी बॅटींग

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये (IPL 2022) मंगळवारी राजस्थान रॉयल्सनं दमदार विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये राजस्थानला नवा मिस्टर 360 मिळला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च : इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये (IPL 2022) मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad) यांच्यात लढत झाली. पुण्यात झालेल्या या मॅचमध्ये रॉयल्सनं हैदराबादचा 61 रननं पराभव केला. या विजयानंतर संजू सॅमसनची टीम आयपीएल स्पर्धेतील पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर पोहचली आहे. राजस्थानच्या या विजयात कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) यांचे दमदार योगदान होते. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये राजस्थाननं टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 210 रन केले. संजू सॅमसननं कॅप्टनसीला साजेसी खेळ केला. त्याने तीन फोर आणि पाच सिक्सच्या मदतीनं 27 बॉलमध्ये 55 रन केले. तर हेटमायरनं 13 बॉलमध्ये 32 रनची आक्रमक खेळी केली. राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी हेटमायरची जोरदार प्रशंसा केली. तो वेस्ट इंडिज टीममधील मिस्टर 360 खेळाडू होऊ शकतो असा दावा शास्त्री यांनी केला. ‘हेटमायरमध्ये मोठी गुणवत्ता आहे. तो त्याचे शॉट्स सुधारण्यावर नेहमी काम करतो. याचा त्याला चांगला फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये 360 डिग्री खेळाडू होण्याची क्षमता आहे,’ असं मत शास्त्री यांनी व्यक्त केले. हेटमायर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडू खेळत होता. त्याला राजस्थान रॉयल्सनं 8.5 कोटींमध्ये खरेदी केले. आपण टीमला गरज असेल तिथं खेळण्यास तयार असल्याचं हेटमायरनं काही दिवसांपूर्वी बोलताना सांगितले होते. Women’s World Cup : ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजचा केला मोठा पराभव, 9 व्यांदा फायनलमध्ये धडक राजस्थान रॉयल्सनं मोठ्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थान  3.050 च्या रनरेटसह  पहिल्या क्रमांकावर आहेत. दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि गुजरातपेक्षा राजस्थानचा रनरेट जास्त आहे. दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचा रनरेट 0.914 आहे. दिल्लीने मुंबईला पराभूत केलं होतं. त्यानंतर पंजाब किंग्स तिसऱ्या नंबरवर आहे. त्यांनी आरसीबी विरुद्ध 206 धावांचे मोठे लक्ष्य पार केले होते. 0.697 त्यांचा नेट रनरेट आहे. त्यानंतर कोलकाता चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या