मुंबई, 9 मार्च : आयपीएल स्पर्धेचा आगामी सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वूच मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख फास्ट बॉलर एनरिच नॉर्किया (Anrich Nortje) दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धा खेळण्याची शक्यता कमी आहे. नॉर्किया हा दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात प्रमुख बॉलर आहे. दिल्लीनं या सिझनपूर्वी रिटेन केलेल्या 4 खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. नॉर्कियाच्या फिटनेसमुळे दिल्लीच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. नॉर्कियाला भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिजपूर्वी डिसेंबर महिन्यांत दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. बांगलादेश विरूद्धच्या वन-डे सीरिजसाठी आफ्रिकेनं निवडलेल्या टीममध्येही नॉर्किया निवड झालेली नाही. नॉर्खिया आयपीएलमध्ये खेळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, पण ‘क्रिकेट साऊथ आफ्रिका’ त्याला परवानगी देण्याची शक्यता कमी आहे, असं वृत्त ‘इनसाईड स्पोर्ट्स’नं दिलं आहे. नॉर्कियाचा आयपीएल रेकॉर्ड दमदार आहे. त्याने आयपीएल 2020 साली 22 विकेट्स घेतल्या होत्या. तर मागील सिझनमध्ये 8 मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या. सातत्यानं 140 किमी पेक्षा जास्त वेगानं फास्ट बॉलिंग करण्याची त्याची क्षमता पाहून दिल्लीनं त्याला अनुभवी कागिसो रबाडाच्या जागी पसंती दिली. कॅप्टन ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि पृथ्वी शॉ यांच्यासह त्यांनी नॉर्कियाला रिटेन केले आहे. नॉर्कियाची अनुपस्थिती हा दिल्लीसाठी दुसरा धक्का आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) हा देखीय आयपीएल स्पर्धेच्या सुरूवातीच्या टप्प्यात खेळणार नाही. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात 18 मार्च पासून सुरू होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी एन्गिडीची निवड झालेली आहे. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात 18 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान 3 वन-डे आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळली जाणार आहे. या सीरिजमुळे आफ्रिकेचे प्रमुख खेळाडू आयपीएल स्पर्धेतील पहिले 3 आठवडे अनुपलब्ध असतील. या प्रश्नावर तोडगा काढण्याठी बीसीसीआय क्रिकेट साऊथ आफ्रिकेशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. IPL 2022 : धोनीनंतर आता हार्दिकचाही रैनाला धक्का, मिस्टर आयपीएलची अखेरची आशाही मावळली दिल्ली कॅपिटल्सची संपूर्ण टीम : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन) सरफराज खान, केएस भरत, मनदीप सिंग, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, खलील अहमद, अश्विन हेब्बार, रिपल पटेल, यश ढूल, विकी ओत्सवाल, लुंगी एनगिडी, टीम सायफर्ट, प्रवीण दुबे, रोव्हमन पॉवेल आणि ललित यादव