JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सचिनच्या पावलावर विराटचं पाऊल, 3 दिवसांमध्ये घेतले 2 मोठे निर्णय

सचिनच्या पावलावर विराटचं पाऊल, 3 दिवसांमध्ये घेतले 2 मोठे निर्णय

या आयपीएलनंतर (IPL 2021) आरसीबीची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा विराटनं रविवारी केली. यापूर्वी तीन दिवसांपूर्वी गुरुवारी त्यानं टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टनसी या वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) बॅट्समन म्हणून अनेक रेकॉर्ड केले आहेत. मात्र कॅप्टन म्हणून त्याला आजवर एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. तसंच तो आरसीबीचा (RCB) कॅप्टन म्हणून देखील आयपीएल विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला. या आयपीएलनंतर (IPL 2021) आरसीबीची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा विराटनं रविवारी केली. यापूर्वी तीन दिवसांपूर्वी गुरुवारी त्यानं टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टनसी या वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. विराट कोहलीला कॅप्टन म्हणून सचिन तेंडुलकरसारखीच (Sachin Tendulkar) निराशा सहन करावी लागली आहे. सचिन दोन वेळा टीम इंडियाचा कॅप्टन बनला, पण टीमच्या खराब कामगिरीमुळे त्याला स्वत:हून राजीनामा द्यावा लागला. विराटनं आजवर 132 आयपीएल मॅचमध्ये कॅप्टनसी केली आहे. यामध्ये 60 मॅच जिंकल्या असून 65 मध्ये आरसीबीचा पराभव झाला आहे. तीन मॅच बरोबरीत सुटले तर 4 मॅचचा कोणताही निकाल लागला नाही. विराट आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त रन काढणारा बॅट्समन आहे. पण त्याच्यावर टीमला विजेतेपद जिंकून देण्याचा दबाव होता. विराटची तुलना नेहमी रोहित शर्माशी (Rohit Sharma) केली जाते. रोहितच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं आजवर 5 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही विराटनं सर्वात जास्त रन काढले आहेत. तो या प्रकारात 3 हजारपेक्षा जास्त रन करणारा एकमेव बॅट्समन आहे. विराटनं 45 टी20 मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं. यामध्ये त्यानं 27 मध्ये विजय मिळवला. तर 14 मॅच गमावल्या. तो यंदा पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन म्हणून उतरणार आहे. विराट कोहलीला आगमी दोन महिन्यात आयपीएल आणि टी20 वर्ल्ड कप या दोन मोठ्या स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. IPL 2021 : पहिल्या मॅचआधी विराटचा मोठा निर्णय, RCB ची कॅप्टन्सीही सोडली सचिन कॅप्टन म्हणून फेल सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील सर्वात महान बॅट्समन आहे. त्यानं क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकांसह अनेक रेकॉर्ड केले आहेत. पण कॅप्टन म्हणून सचिनचा रेकॉर्ड खराब आहे. सचिन 1996 साली सर्वप्रथम कॅप्टन बनला. खराब कामगिरीमुळे 1997 साली त्याला कॅप्टनसी सोडावी लागली. T20 वर्ल्ड कपनंतर भारतामध्ये रंगणार क्रिकेटचा थरार, पाहा 4 देशांविरुद्धच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक ऑगस्ट 1999 साली सचिन दुसऱ्यांदा कॅप्टन बनला. पण पुन्हा एकदा तो कॅप्टन म्हणून अपयशी ठरला. सचिनच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 73 पैकी फक्त 23 वन-डे जिंकल्या. तर टेस्ट क्रिकेटमध्ये 25 पैकी 4 टेस्ट जिंकण्यात यश आलं. तर 9 टेस्टमध्ये पराभव झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या