मुंबई, 10 फेब्रुवारी: वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे सीरिजमधील (India vs West Indies) तिसरी आणि शेवटची वन-डे शुक्रवारी होणार आहे. ही वन-डे जिंकत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देण्याची संधी भारताला आहे. या सीरिजमधील पहिल्या वन-डेपूर्वी शिखर धवनसह (Shikhar Dhawan) 4 भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता यापैकी धवन संपूर्ण फिट झाला असून तो टीममध्ये परतल्यास सलग तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियात बदल होणार आहे. या सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये इशान किशननं (Ishan Kishan) तर दुसऱ्या मॅचमध्ये ऋषभ पंतनं (Rishabh Pant) रोहित शर्मासोबत ओपनिंग केली होती. आता तिसऱ्या वन-डेमध्ये रोहित-शिखर ही अनुभवी जोडी ओपनिंगला येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी दुसरी मॅच जिंकल्यानंतरच शिखर धवन शेवटच्या मॅचमध्ये खेळणार असल्याचं रोहितनं जाहीर केले आहे. त्यामुळे ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे मिडल ऑर्डरमध्ये उतरतील. सूर्यकुमारनं मागच्या मॅचमध्ये 64 रनची खेळी करत त्याची जागा सुरक्षित केली आहे. त्यामुळे धवनसाठी दीपक हुड्डाला (Deepak Hooda) वगळले जाऊ शकते. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी मिळणार की नाही? हे पाहावे लागेल. भारतीय बॉलर्सनी या सीरिजमध्ये दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला 176 आणि 193 रनवर रोखले. आता सीरिज जिंकल्यानंतर टीम मॅनेजमेंट बॉलिंगमध्येही काही बदल करू शकतो. टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. कुलदीप किंवा रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यापैकी एकाची निवड होऊ शकते. त्या परिस्थितीमध्ये युजवेंद्र चहल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना विश्रांती दिली जाईल. IND vs WI : विराट कोहलीनं केलं ऑल राऊंडरचं स्वप्न पूर्ण! मॅचपूर्वी दिली खास भेट, VIDEO फास्ट बॉलिंगमध्ये आवेश खान (Avesh Khan) संधीची वाट पाहात आहे. दुसऱ्या मॅचमध्ये प्रसिद्ध कृष्णानं 4 विकेट्स घेतल्या. शार्दुलनं देखील चांगली बॉलिंग केली. त्यामुळे आवेशला खेळवण्यासाठी मोहम्मद सिराजला वगळले जाऊ शकते.