मुंबई, 10 फेब्रुवारी: टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरूद्ध बुधवारी झालेली दुसरी वन-डे (India vs West Indies 2nd ODI) 44 रननं जिंकली. या विजयासह वन-डे सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) वन-डे टीमचा कॅप्टन झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज होती. त्यामुळे हा विजय रोहितसाठी विशेष आहे. त्याचबरोबर भारतीय टीममधील ऑल राऊंडर दीपक हुड्डासाठी (Deepak Hooda) देखील ही सीरिज खास आहे. हुड्डानं या सीरिजमधील पहिल्या वन-डेमध्ये टीम इंडियात पदार्पण केले. भारतीय टीमची ऐतिहासिक हजाराव्या वन-डेमध्ये हुडानं पदार्पण केले. त्यानंतर बुधवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये देखील तो टीममध्ये होता. त्याने 29 रनची उपयुक्त खेळी केली. तसंच 1 विकेट घेत बॉलिंगमध्येही योगदान दिले. या कामगिरीनंतर हुड्डानं ‘बीसीससीआय टीव्ही’ ला मुलाखत दिली. सूर्यकुमार यादवनं हुड्डाची मुलाखत घेतली.
हुड्डानं या मुलाखीतीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा अनुभव सांगितला. ‘मी पहिल्या वन-डेमध्ये पदार्पण केले. तो अविस्मरणीय अनुभव होता. तुम्ही नेहमीच यासाठी कठोर मेहनत करत असता. मला टीमचा सदस्य झाल्यानं अभिमान वाटत आहे. विराट कोहली किंवा महेंद्रसिंह धोनीकडून डेब्यू मॅचमध्ये कॅप घेणे हे माझे लहाणपणापासूनचे स्वप्न होते. विराटकडून कॅप प्रत्यक्षात मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती.’ असे हुड्डाने यावेळी सांगितले. IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा ‘तो’ निर्णय ठरणार महाग, 6 कोटींच्या खेळाडूनं वाढवली डोकेदुखी हुड्डा यावेळी पुढे म्हणाला कि, ‘चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. पण, नेहमी त्यासाठी स्वत:ला तयार ठेवा. विराट कोहली, रोहित शर्मा, राहुल द्रविड या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे हे माझे भाग्य आहे. त्यांच्यापासून नेहमीच खूप काही शिकायला मिळते. मी ते शिकण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या काम योग्य पद्धतीने करण्यावर माझा फोकस आहे. मी परिणामांचा जास्त विचार करत नाही.’