अहमदाबाद, 11 फेब्रुवारी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील तिसरी आणि शेवटची वन-डे आज (शुक्रवार) अहमदाबादमध्ये होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या दोन वन-डे जिंकत या सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरी वन-डे जिंकत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल. या सामन्यात अनुभवी बॅटर शिखर धवन (Shikhar Dhawan) खेळणार असल्याचं रोहितनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. धवन दीपक हुड्डाची (Deepak Hooda) जागा घेण्याची शक्यता आहे. ही सीरिज सुरू होण्यापूर्वी धवनसह श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. आता हे सर्वजण कोरोनातून बरे झाले असून तिसऱ्या वन-डेसाठी उपलब्ध आहेत. दुसरिकडं वेस्ट इंडिजच्या टीमनं या सीरिजमध्ये खराब कामगिरी केली आहे. दोन्ही मॅचमध्ये त्यांना पूर्ण 50 ओव्हर्स खेळण्यात अपयश आले. तसंच त्यांना 200 रनचा टप्पाही ओलांडता आला नाही. कॅप्टन कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) फिटनेसनं वेस्ट इंडिजची चिंता वाढवली आहे. पोलार्ड खराब फिटनेसमुळे दुसरी वन-डे खेळू शकला नव्हता. आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) होणारी ही शेवटची वन-डे आहे. या मॅचमध्ये दमदार कामगिरी करत टीमचं लक्ष वेधण्याची चांगली संधी दोन्ही टीममधील खेळाडूंना आहे. ड्वेन ब्राव्होचा जिवलग मित्र भारतामध्ये बेपत्ता, चॅम्पियननं केलं मदतीचं आवाहन भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरी वन-डे कधी सुरू होईल? भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरी वन-डे 11 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. दुपारी 1 वाजता टॉस होईल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरी वन-डे कुठे होणार आहे? भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरी वन-डे नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद इथे होणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वन-डेचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येणार आहे? भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वन-डेचे लाईव्ह प्रसारण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर पाहता येणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वन-डेचे Live Streaming कुठे पाहता येणार आहे? भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वन-डेचे Live Streaming हॉटस्टारवर पाहाता येणार आहे