मुंबई, 7 फेब्रुवारी : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीच्या युगाची सुरूवात विजयानं झाली आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये (IND vs WI 1st ODI) 6 विकेट्सनं विजय मिळवला. रोहितनं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. रोहितनं डीआरएसचा उत्तम वापर करत वेस्ट इंडिजला 176 रनवर रोखले. त्यानंतर टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी DRS चं बारसं केलं आहे. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसली. या दोघांनी आजवर एकत्र बॅटींग करताना अनेक चांगल्या पार्टनरशिप केल्या आहेत. यावेळी टीम इंडियाच्या फिल्डिंगच्या दरम्यान देखील दोघांमध्ये समन्वय होता. रोहितनं विराटला डीआरएस घेण्याचा आग्रह केला. तेव्हा कॅप्टननं तो आग्रह मान्य केला. त्यावेळी कॉमेंट्री करत असलेल्या गावसकरांनी एक प्रस्ताव दिला. गावसकर यावेळी म्हणाले की, ‘यापूर्वी महेंद्रसिंह धोनी अचूक रिव्यू घेत असे. त्यावेळी DRS चं नाव ‘धोनी रिव्यू सिस्टम होते.’ आता रोहित शर्मा देखाील बरोबर रिव्यू घेत आहे. त्यामुळे मला वाटतं की आता ‘डेफिनेटली रोहित सिस्टम’ असं DRS चं नाव हवं. या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतीय स्पिनर्ससमोर वेस्ट इंडिजच्या बॅटिंगने (India vs West Indies 1st ODI) लोटांगण घातलं. 176 रनवर वेस्ट इंडिजचा ऑल आऊट झाला. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 4 तर वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाला 2 आणि मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. U19 WC : टीम इंडियाचं अभिनंदन करताना शाहिद कपूरनं केली ‘गलती से मिस्टेक’ वेस्ट इंडिजने दिलेल्या 177 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 28 ओव्हरमध्येच 4 विकेट गमावून केला. सूर्यकुमार यादव 34 रनवर तर दीपक हुड्डा 26 रनवर नाबाद राहिले. वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात 13 ओव्हरमध्ये 84 रनची पार्टनरशीप झाली. या विजयासोबतच भारताने तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी मॅच अहमदाबादमध्येच बुधवार 9 फेब्रुवारीला होणार आहे.