मुंबई, 4 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये मोहालीमध्ये सुरू झालेली टेस्ट विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास आहे. विराटची ही 100 वी टेस्ट आहे. 2011 साली विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 11 वर्षांनी त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मोहाली टेस्ट सुरू होण्यापूर्वी विराटचा या निमित्तानं सत्कार करण्यात आला. टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) खास स्मृतीचिन्ह देऊन विराटचा सत्कार केला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यावेळी उपस्थित होती. राहुल द्रविडनं सत्कार केल्यानंतर विराट चांगलाच भावुक झाला होता. ‘राहुल भाई या खास क्षणासाठी धन्यवाद. माझी पत्नी माझ्यासोबत इथं आहे. माझा भाऊ स्टँडमध्ये उपस्थ्त आहे. हा टीम गेम आहे. माझा संपूर्ण प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता. बीसीसीआयचेही धन्यवाद. माझ्या लहाणपीच्या हिरोकडून मला हा पुरस्कार मिळतोय. मी अंडर-15 खेळत असतानाच्या काळातील तुमचा फोटो आजही माझ्याकडे आहे.’ अशी प्रतिक्रिया विराटनं व्यक्त केली.
100 टेस्टचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा 12 वा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, इशांत शर्मा, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा टप्पा पूर्ण केला आहे. रोहित शर्मानं टॉस जिंकला, पाहा कुणी घेतली Playing11 मध्ये पुजारा आणि अजिंक्यची जागा विराटनं 100 टेस्टच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये 50.39 च्या सरासरीनं 7962 रन केले आहेत. यामध्ये 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटनं नोव्हेंबर 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेलं नाही. या टेस्टमध्ये ही प्रतीक्षा संपवण्याचा विराटचा प्रयत्न असेल.