मुंबई, 23 डिसेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता बराच कालावधी उलटला आहे. निवृत्तीनंतरही सचिन क्रिकेटपासून लांब गेलेला नाही. विशेषत: टीम इंडियाच्या कामगिरीवर सचिनचे बारीक लक्ष असते. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. या दौऱ्यावरील एका बॉलरची सचिननं जोरदार प्रशंसा केली आहे. टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) सचिननं प्रशंसा केली आहे. ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ कार्यक्रमात सचिन सिराजबद्दल म्हणाला की, ‘त्याच्या पायात स्प्रिंग आहे. मला त्याला खेळताना पाहायला आवडते. त्याचा रन अप…तुम्ही पाहू शकता. त्याच्यात भरपूर ऊर्जा आहे. तो दिवसभरातील पहिली ओव्हर टाकतोय की शेवटची हे तुम्हाला समजणार नाही. तो नेहमी तुमच्यावर वरचढ असेल. तो एक प्रॉपर फास्ट बॉलर आहे. त्याची दहेबोली खूप सकारात्मक आहे. हे मला खूप आवडतं. तो खूप लवकर शिकतो.’ या शब्दात सचिनने सिराजच्या कामगिरीते वर्णन केले आहे. सचिननं केलेल्या या प्रशंसेनंतर सिराज देखील भारावून गेला आहे. सिराजनं ट्विट करत सचिनचे आभार मानले आहेत. ‘सचिन सर, या प्रशंसेसाठी धन्यवाद. तुम्ही केलेले कौतुक ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. मी नेहमीच देशासाठी सर्वश्रेष्ठ कामगिरी करेन.’
सिराजनं सर्वप्रथम आयपीएल स्पर्धेतून सर्वांचं लक्ष वेधले. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याने टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण केले. सिराजने आजवर 10 टेस्ट खेळल्या असून त्यामध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडमध्ये टीम इंडियानं मिळवलेल्या विजयात त्याच्या बॉलिंगचे योगदान महत्त्वाचे होते. सिराजची उपयुक्तता लक्षात घेऊन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमनं त्याला आगामी आयपीएल सिझनसाठी (IPL 2022) रिटेन केले आहे. Kohli vs Ganguly: माजी कॅप्टनची विराटला साथ, गांगुलीला सुनावले खडे बोल