मुंबई, 10 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीमध्ये पार पडला. आता 12 जून रोजी दुसरा सामना कटकमध्ये होत आहे. कोरोना काळात ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकले नाहीत, तिथं ही मालिका खेळवली जात आहे. त्यामुळे साहजिकच या सामन्याच्या तिकीट विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कटकमध्ये रविवारी होणाऱ्या सामन्याची तिकीटं खरेदी करण्यासाठी फॅन्सनी जोरदार गर्दी केली होती. ही गर्दी इतकी वाढली की नंतर महिलांमध्ये मारामारी झाली. तसंच पोलिसांना जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. गुरूवारी बाराबती स्टेडिअमच्या बाहेर कडक उन्हात तिकीट खरेदीसाठी मोठी रांग लागली होती. यावेळी काही महिला ही रांग मोडून पुढे आल्या. त्यानंतर गोंधळ सुरू झाला, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार काऊंटरवर उपलब्ध असलेल्या 12 हजार तिकीटांच्या खरेदीसाठी सुमारे 40 हजार नागरिक स्टेडिअम बाहेर उपस्थित होते. ही तिकीट विक्री सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. IND vs SA : भारताचं वर्ल्ड रेकॉर्डचं स्वप्न भंगलं, जवळच्या मित्रानंच दिला पंतला दगा कटकमध्ये अडीच वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. यापूर्वी इथं डिसेंबर 2019 मध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे सामना झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना होत असून तो पाहण्यासाठी फॅन्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे.