JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

IND vs NZ: श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer) झळकावले. हे शतक झळकावल्यानं त्याची खूप वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer) झळकावले. पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावणारा श्रेयस हा 16 वा भारतीय बनला आहे. हे शतक झळकावल्यानं त्याची खूप वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होणार आहे. श्रेयसला एका खास व्यक्तीला घरी जेवायला बोलवायचे आहे. पण, टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतरच घरी जेवायला येणार अशी अट त्या व्यक्तीनं घातली होती. ती अट आता पूर्ण झाली आहे. श्रेयस अय्यरच्या क्रिकेटपटू म्हणून जडणघडणीत त्याचे मुंबईचे कोच आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू प्रवीण आम्रे (Pravin Amre) यांचा मोठा वाटा आहे. श्रेयसनं शुक्रवारी शतक झळकावून आम्रेंना घरी जेवायला बोलवण्याचा अधिकार मिळवला आहे. कारण, टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतरच घरी जेवायला येणार, अशी अट आम्रे यांनी त्याला घातली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रेयसनं हा खुलासा केला. ‘मी ट्रेनिंगला गेल्यावर प्रवीण सर म्हणत असतं की तू आयुष्यात खूप काही मिळवलं आहेस.तू आयपीएल टीमची कॅप्टनसी केली आहेस. एवढे रन काझले आहेत. तुला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल तेव्हा ती तुझी मुख्य उपलब्धी असेल. मला टेस्ट क्रिकेटची कॅप मिळाल्यावर त्यांना खूप आनंद झाला असणार याची खात्री आहे. आता मी त्यांना मेसेज करणार असून घरी जेवायला बोलवणार आहे. IND vs NZ: गावसकरांकडून कॅप घेणाऱ्या श्रेयसनं केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी मी पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे, याचा अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही. मला अनेक मेसेज येत आहे. सर्वांनीच ही एक मोठी उपलब्धी असल्याचं सांगितलं आहे. हे सर्व मेसेज वाचून मला मुंबईतील क्रिकेटचे दिवस आठवले. हा एक खूप छान अनुभव आहे.’ असे श्रेयसने स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या