JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: कानपूरमध्ये राहुल द्रविडची धूम, पोलिसांपासून फॅन्सपर्यंत सर्वांमध्ये 'द वॉल'ची क्रेझ

IND vs NZ: कानपूरमध्ये राहुल द्रविडची धूम, पोलिसांपासून फॅन्सपर्यंत सर्वांमध्ये 'द वॉल'ची क्रेझ

कानपूरमधील क्रिकेट फॅन्समध्ये दोन्ही देशांच्या खेळाडूंपेक्षा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची (Rahul Dravid) जास्त क्रेझ आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 24 नोव्हेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टेस्ट मॅच गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये दोन्ही टीमचकडून दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत (World Test Championship) होणारी प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही टीम सध्या जोरदार सराव करत आहेत. कानपूरमधील क्रिकेट फॅन्समध्ये दोन्ही देशांच्या खेळाडूंपेक्षा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची (Rahul Dravid) जास्त क्रेझ आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार या सीरिजमध्ये जयपूर, रांची, कोलकाका आणि आता कानपूर या 4 शहरांमध्ये टीम इंडियानं प्रवास केला आहे. या चारही शहरात हेच वातावरण आहे. कानपूर टेस्टपूर्वी नेट प्रॅक्टीससाठी द्रविड मैदानावर उतरला तेव्हा सर्वांचं लक्ष त्याच्याकडंच होतं. मैदानाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी राहुल द्रविडसोबत सेल्फी काढली. फोटो काढण्यासाठी या फॅन्सनी द्रविड, द्रविडच्या घोषणा देखील दिल्या. राहुल द्रविड क्रिकेटपटू असल्यापासूनच लोकप्रिय आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या अव्वल खेळाडूंशी त्याची तुलना केली जाते. निवृत्तीनंतरही द्रविडची लोकप्रियता वाढत आहे. तो यापूर्वी अंडर 19 टीमचा कोच होता. त्या मार्गदर्शनाचा टीम इंडियाचा तरूण खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. सोशल मीडियावर याबाबत नेहमीच द्रविडची प्रशंसा केली जाते. त्यामुळे आता द्रविड पुन्हा एकदा टीम इंडियासोबत आल्यानं त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रोहित शर्मामुळे विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूचं करिअर समाप्त टीम इंडियाचे लक्ष्य निश्चित विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन असेल. भारताचा हेड कोच म्हणून राहुल द्रविडची ही पहिलीच सीरिज आहे, त्यामुळे तो तयारीमध्ये कोणतीही कमी सोडत नाहीये. कानपूरमध्ये सराव सत्रामध्येही द्रविडनं टीमच्या प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची (Rahul Dravid) ही पहिलीच टेस्ट सीरिज आहे, त्यामुळे त्याचं लक्ष्य टी-20 सीरिजप्रमाणेच टेस्ट सीरिजमध्येही क्लीन स्वीप करण्याकडे असेल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या