मुंबई, 3 जुलै : भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात एजबस्टनमध्ये पाचवी टेस्ट सुरू आहे. या टेस्टचा दुसरा दिवस टीम इंडियाचा कॅप्टन जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) गाजवला. फास्ट बॉलर अशी ओळख असलेल्या बुमराहनं सर्वप्रथम स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 35 रन काढले. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यानंतर त्यानं भेदक मारा करत इंग्लंडची टॉप ऑर्डर परत पाठवली. शनिवारचा दिवस हा फक्त बुमराहचा होता. कारण, त्यानं केलेल्या चुकांचाही टीम इंडियाला फायदा झाला. बुमराहाला त्याच्या तीनपैकी दोन विकेट नो बॉलमुळे मिळाल्या. हे वाचल्यावर तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. त्यानं तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अॅलेक्स लीजला बोल्ड केलं. त्यानं त्यापूर्वी नो बॉल टाकला नसता तर त्याला एक जास्तीचा बॉल टाकण्याची संधी मिळाली नसती. त्या ओव्हरमध्ये बुमराहनं चूक केली होती. त्यामुळे त्याला सातवा बॉल टाकावा लागला. त्यावर त्याला विकेट मिळाली. न्यूझीलंड विरूद्धच्या सीरिजमध्ये चांगली बॅटींग करणाऱ्या ओली पोपला बुमराहनं 11 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आऊट केले. त्या ओव्हरमध्येही बुमराहनं एक नो बॉल टाकला होता. त्यामुळे त्याला सात बॉलची ओव्हर टाकावी लागली. दोन वेळा नो बॉलवर विकेट मिळाल्यानं बुमराह देखील आश्चर्यचकीत झाला होता.
बुमराहचा वर्ल्ड रेकॉर्ड इंग्लंडच्या टॉप ऑर्डरच्या तीन बॅटर्सना बुमराहनंच आऊट केले. यापूर्वी त्यानं बॅटींगमध्येही वर्ल्ड रेकॉर्ड केला. स्टुअर्ट ब्रॉडनं बुमराहला टाकलेल्या एका ओव्हरमध्ये 35 रन निघाले. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात महागडी ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये बुमराहनं 29 रन काढले. कोणत्याही बॅटरनं टेस्ट क्रिकेटमधील एका ओव्हरमध्ये काढलेले हे सर्वात जास्त रन आहेत. VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, ऋषभ पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन की.. बुमराहनं ब्रॉडच्या ओव्हरमध्ये 4 फोर आणि 2 सिक्स लगावले. त्यानं यावेळी वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराचा रेकॉर्ड मोडला. लारानं 2003 साली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रॉबिन पिटरसनच्या एकाच ओव्हरमध्ये 28 रन काढले होते.