JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : विराटची 100 व्या टेस्टमध्ये मोठी चूक, विकेट पाहून बसणार नाही विश्वास! VIDEO

IND vs SL : विराटची 100 व्या टेस्टमध्ये मोठी चूक, विकेट पाहून बसणार नाही विश्वास! VIDEO

टीम इंडिया माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मोहालीमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील 100 वी टेस्ट खेळत आहे. या टेस्टमध्ये त्यानं शतक करावं अशी सर्व फॅन्सची इच्छा होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहाली, 4 मार्च : टीम इंडिया माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मोहालीमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील 100 वी टेस्ट खेळत आहे. या टेस्टमध्ये त्यानं शतक करावं अशी सर्व फॅन्सची इच्छा होती. विराटच्या शतकाकडं डोळे लावून बसलेल्या फॅन्सची निराशा झाली. मोहाली टेस्टमध्ये रंगात आलेला विराट 45 रन काढून आऊट झाला. विराट ज्या पद्धतीनं आऊट झाला ते पाहून अनेक फॅन्सचा डोळ्यावर विश्वास बसला नाही. श्रीलंकेचा स्पिनर एमबुलडेनियाचा बॉल बॅकफुटवर खेळण्याचा विराटचा प्रयत्न फसला. त्याला काही कळण्याच्या आता बॉल विराटच्या बॅटला चकवून स्टंपला लागला होता. 100 टेस्टचा अनुभव अससणाऱ्या विराटनं ही मोठी चूक केली. विराटलाही या चुकीचा मोठा धक्का बसला होता.

संबंधित बातम्या

विराटनं आऊट होण्यापूर्वी हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 रनची भागिदारी केली. त्यामध्ये विराटनं 45 रन केले. 76 बॉलमध्ये 5 फोरसह विराट सहज खेळत होता. या खेळीच्या दरम्यान त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार रनचा टप्पाही पूर्ण केला. विराट-विहारीची जोडी धोकादायक होत असतानाच विराटच्या चुकीनं श्रीलंकेला दिलासा मिळाला. विराट आऊट झाल्यानं त्याचं शतक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी करणाऱ्या फॅन्सची निराशा झाली. मोहाली टेस्टमध्ये कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि मयंक अग्रवाल जोडीनं टीम इंडियाला आक्रमक सुरूवात करून दिली. या दोघांनाही चांगल्या सुरूवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. रोहित 29 तर मयंक 33 रन काढून आऊट झाला. टीम इंडियानं लंचपर्यंत 2 आऊट 109 रन केले होते. सौरव गांगुलीनं मोडले BCCI चे नियम, निवड समिती सदस्यांनीच केली पोलखोल लंचनंतर विराट आणि विहारी जोडीनं खेळावर नियंत्रण मिळवलं होतं. त्याचवेळी श्रीलंकेनं आधी विराटला आणि नंतर विहारीला आऊट करत मॅचमध्ये पुनरागमन केलं. चेतेश्वर पुजाराच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या विहारीनं अर्धशतक झळकावले. तो 58 रन काढून आऊट झाला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या