JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : टीम इंडियात KKR च्या दिग्गजाची एन्ट्री, खेळाडूंचा होणार मोठा फायदा

IND vs SA : टीम इंडियात KKR च्या दिग्गजाची एन्ट्री, खेळाडूंचा होणार मोठा फायदा

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) मालिकेपासून केकेआरच्या दिग्गजाची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. त्यांच्या समावेशाचा खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.

जाहिरात

फोटो : BCCI

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जून : आयपीएलनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून टी20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी टीमनं सोमवारी पहिल्यांदा एकत्र सराव केला. या मालिकेसाठी आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीची या मालिकेपासून टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. ही व्यक्ती कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) बराच काळ सदस्य होती. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेपासून टीम इंडियाचे फिजियो म्हणून कमलेश जैन (Kamlesh Jain) यांची एन्ट्री झाली आहे. जैन यांना केकेआरसोबत काम करण्याचा मोठा अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा टीम इंडियाला फायदा होईल. माजी फिजियो नितीन पटेल यांच्या जागेवर जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळूरूतील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या (NCA) मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून नितीन पटेल यांना पाठवण्यात आलं आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सल्ल्यानंतर पटेल यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

कमलेश जैन हे तब्बल 10 वर्ष केकेआरसोबत होते. यापैकी शेवटचे तीन वर्ष त्यांनी टीमचे हेड फिजियो म्हणून काम केलं आहे. भारतीय टीमच्या सोमवारी झालेल्या पहिल्या सराव सत्रामध्ये जैन सहभागी झाले होते. IND vs SA : टीम इंडियानं सुरू केला सराव, पाहा पहिल्या मॅचमध्ये कुणाला मिळणार संधी? दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टीम : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या