मुंबई, 10 जून : दक्षिण आफ्रिका विरूद्ध दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात इशान किशननं (Ishan Kishna) 76 रनची जोरदार खेळी केली. त्याची ही खेळी टीम इंडियाचा पराभव टाळू शकली नाही. दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात 7 विकेट्सनं विजय मिळवला. भारतीय टीमच्या या पराभवातही इशान किशनच्या खेळीची चर्चा होती. या दमदार खेळीनंतरही इशानला टीम इंडियातील जागेची खात्री नाही. त्यानं स्वत:च मॅच संपल्यानंतर याची कबुली दिली आहे. इशाननं पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘रोहित आणि राहुल वर्ल्ड क्लास खेळाडू आहेत. ते टीममधील असतील तेव्हा मला जागा नसेल. माझं काम सरावात चांगली कामगिरी करणे हे आहे. मला संधी मिळेल तेव्हा मी स्वत:ला सिद्ध करण्याबरोबरच टीमसाठी चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे माझा पूर्ण फोकस हा माझा खेळ आहे.’ इशान यावेळी पुढे म्हणाला की, ’ त्यांनी (रोहित आणि राहुल) यांनी देशासाठी भरपूर रन केले आहेत. मी त्यांना माझ्यासाठी स्वत:ला ड्रॉप करा आणि मला ओपनिंगला खेळवा हे सांगू शकत नाही. मी माझं काम करणार आहे. निवड समिती आणि कोच याबाबत विचार करतील.’ IPL Media Rights : BCCI रविवारी होणार मालामाल, 5 कंपन्यांमध्ये रंगणार जोरदार चुरस इशान किशनने रविवारच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 76 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय श्रेयस अय्यरने 27 बॉलमध्ये 36 आणि कर्णधार ऋषभ पंतने 16 बॉलमध्ये 29 रन केले. हार्दिक पांड्याने 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 258.33च्या स्ट्राईक रेटने 12 बॉलमध्ये नाबाद 31 रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज, एनरिच नॉर्किया, वेन पारनेल आणि ड्वेन प्रिटोरियस यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.