कोलकाता, 21 नोव्हेंबर: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना (IND vs NZ 3rd T20I) कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन मैदानात रविवारी खेळणार आहे. जयपूर आणि रांचीमधील सामने जिंकत टीम इंडियानं यापूर्वीच ही मालिका जिंकली आहे. आता शेवटच्या सामन्यात टीम मॅनेजमेंट टीम इंडियाची नजर ‘क्लीन स्वीप’ वर आहे. त्याचबरोबर या मालिकेत अद्याप संधी न मिळालेल्या राखीव खेळाडूंना देखील टीम मॅनेजमेंट प्लेईंग 11 मध्ये खेळवण्याची शक्यता आहे. कुणाला मिळणार संधी? आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारा ऋतुराज गायकवाड टॉप 3 मध्ये कोणत्याही क्रमांकावर बॅटींग करू शकतो. ऋतुराजला खेळवण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा किंवा व्हाईस कॅप्टन केएल राहुल यांना बाहेर बसावं लागेल. आगामी टेस्ट सीरिजचा विचार करून टीम इंडिया केएल राहुलला विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दीपक चहर किंवा भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खानला संधी मिळू शकते. आर. अश्विन किंवा अक्षर पटेलच्या जागी युजवेंद्र चहल आणि ऋषभ पंतच्या जागी इशान किशनचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. सहावा बॉलर म्हणून टीम इंडियात निवड झालेल्या व्यंकटेश अय्यरला कोलकातामध्ये बॉलिंग करण्याची संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाड, आवेश खान, इशान किशन यापैकी कुणाला शेवटच्या मॅचमध्ये संधी मिळते याकडं क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाला 140 किमी प्रती तास वेगानं बॉल टाकणाऱ्या फास्ट बॉलरची गरज आहे. ही गरज आवेश खान पूर्ण करणार का? याकडं टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडचं लक्ष असेल. आयपीएल स्पर्धेत आवेशनं दिल्ली कॅपिटल्सकडून दमदार खेळ केला होता. त्यानं 14 मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंड क्रिकेटमध्येही सापडला Tim Paine! अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप संभाव्य टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन),ऋतुराज गायकवाड श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान, मोहम्मद सिराज, आणि हर्षल पटेल संभाव्य न्यूझीलंडची टीम: टीम साऊदी (कॅप्टन),मार्टीन गप्टील, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, टीम सिफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल स्टँनर, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने, आणि ट्रेन्ट बोल्ट,